Nagpur Crime : नागपुरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड; हॉटेलवर धाड, दोन परदेशी तरुणींना अटक
Nagpur Crime News : अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी या उझबेकिस्तानच्या आहेत.
Nagpur Crime News : नागपूर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत दोन परदेशी तरुणींसह एकूण तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी या उझबेकिस्तानच्या (Uzbekistan) आहेत.
नागपुरातील हॉटेलवर धाड
पोलिसांच्या माहितीनुसार, नागपुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेलवर धाड टाकत दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्या माहितीनुसार याच्याशी संबंधित एका दलालाला ही पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंतच्या चौकशी प्रमाणे दोघी देह व्यापाराच्या उद्दिष्टाने नागपुरात आल्या होत्या. गेले काही दिवस दोन्ही तरुणी नागपुरातील हॉटेलमध्ये देह व्यापार करत होत्या.
बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य
गेली तीन वर्ष दोघीनी सातत्याने नागपूर, मुंबई आणि दिल्ली असा प्रवास केला असून हे तिन्ही शहर त्यांच्या देह व्यापाराचे केंद्र असल्याचे समोर आले आहे. दरम्यान दोन्ही तरुणींच्या भारतीय व्हिजाचा कालावधी 2019 मध्येच संपुष्टात आल्याचे ही त्यांच्याकडील कागदपत्रांनुसार लक्षात आले आहे. त्यामुळे दोघी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या भारतात राहत असल्याचे समोर आले आहे.
महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
पोलिसांच्या माहितीनुसार, देहव्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या या दोन्ही परदेशी तरुणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले. यानंतर या प्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच या प्रकरणी या तरुणीवर खोटे ओळखपत्र तयार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी या दोन तरुणींसह एकाला म्हणजेच तीन जणांना अटक केली असून त्यांच्यावर देहव्यापार करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणी मोठा खुलासा होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या