एक्स्प्लोर
अपहरण करुन तरुणाची हत्या, तरुणाच्या आईचे नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप
गृहमंत्री अनिल देशमुख यांचं होमटाऊन असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. तीन दिवसांपूर्वी अपहरण होऊन हत्या झालेल्या एका तरुणाच्या आईने नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांचं होमटाऊन असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. चोरी, हत्या, मारामारी अशा घटना सातत्याने शहरात घडत आहेत. तीन दिवसांपूर्वी अपहरण होऊन हत्या झालेल्या सन्नी जांगीड या तरुणाच्या आईने नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. शनिवारी दुपारी सन्नी जांगीडचं मानेवाडा स्मशानभूमी जवळून तीन तरुणांनी अपहरण केलं होतं. सन्नी जांगीडच्या आई नंदा जांगीड यांचा आरोप आहे की, त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांकडे सन्नीचं अपहरण काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांनी केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती.
मात्र, संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. त्यानंतर रात्री उशिरा तक्रार नोंदविली. रविवारी संध्याकाळी 7 वाजता हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत निर्जन जंगलात सन्नी जांगीडचे मृतदेह आढळले. नंदा जांगीड यांचा आरोप आहे की, 'पोलिसांनी तुझा मुलगा गुन्हेगार होता, तुम्ही काही श्रीमंत नाहीत, मग का कोणी तुझ्या मुलाचा अपहरण करेल' असे सांगत अनेक तास तक्रार घेतली नाही आणि सन्नीला शोधण्याचे प्रयत्न केले नाहीत.
पोलिसांनी जर वेळीच पावलं उचलली असती तर त्यांचा मुलगा जिवंत राहिला असता असे आरोप नंदा जांगीड यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे सन्नी जांगीड हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण होता. गुन्हेगारांमधील आपापसातील संघर्षात त्याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, नंदा जांगीड यांच्या आरोपाबद्दल सध्या तरी नागपूर पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत. दरम्यान, सन्नी जांगीडच्या नातेवाईकांनी सन्नीची हत्या गुन्हेगारांमधील वादामुळे नाही तर बलात्काराच्या एक प्रकरणात सन्नीने पीडित तरुणीला मदत केल्याने त्या घटनेतील आरोपींची सन्नीची हत्या करवल्याचा आरोप केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement