एक्स्प्लोर

Gram Panchayat : कचरा संकलन कंत्राटदारांचे बिल थकीत, गाड्या नेणार परत!

प्रशासनाकडून कचरा गाडीबाबत आराखडा तयार करून त्यासाठी रक्कमही निश्चित केली होती. परंतु ही रक्कम वाढवून देण्यासाठी एक सभापती आग्रही होत्या. मात्र ही रक्कम देण्यास प्रशासनाकडून नकार देण्यात आला होता.

नागपूर : स्वच्छ भारत अंतर्गत गावांमधील कचरा संकलनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाड्यांचे पैसे दिले जात नसल्याने आता कंत्राटदारांनी गाड्याच काढून घेण्याची धमकी ग्राम पंचायतींना दिली आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधातून ग्राम पंचायतींकडून कचरा उचल करण्यासाठी गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्या देयकांची फायली ग्राम पंचायतींकडून जिल्हा परिषदेच्या मुख्यलयाकडे पाठविण्यास विलंब होत आहे. यामुळे वित्त विभागाची अडचण होत आहे तर दुसरीकडे देयके अदा होत नसल्याने पुरवठादार करचा गाडी परत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ग्राम पंचायत प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळे कचरा गाड्यांवर संक्रात येणार असल्याचे बोलल्या जात आहे.

वित्त विभागाकडून कोट्यवधींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. हा निधी थेट ग्राम पंचायतींना खर्च करायचा आहे. बंधित आणि अबंधित अशी विभागनी या निधीची करण्यात आली आहे. बंधित निधीचा खर्च हा केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कामावर करायचा आहे. यात स्वच्छता विषयक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींना कचरा गाडी खरेदी करायच्या होत्या. जिल्हा परिषदेत यावरून चांगलीच माथापच्ची झाली होती. गाडीचे दर निश्चित करण्यावरूनही मॅरॉथॉन चर्चा होती.

PM Housing : लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत आक्षेप घेत अर्ज नाकारले, बीडीओचा दावा हाटकोर्टाने फेटाळला

रक्कम वाढवून देण्यासाठी एक सभापती होते आग्रही

जिल्हा परिषद प्रशासनाकडून कचरा गाडीबाबत आराखडा तयार करून त्यासाठी विशिष्ट रक्कमही निश्चित करण्यात आली होती. परंतु ही रक्कम वाढवून देण्यासाठी एक सभापती आग्रही होत्या. परंतु प्रशासनाकडून त्यास नकार देण्यात आल्या. शेवटी गाड्यांची खरेदी करण्यात आली. त्यासाठी ग्राम पंचायत स्तरावरून गाड्यांची खरेदी झाल्या. या गाड्यांच्या वित्त विभागाची मंजुरी आवश्यक आहे. परंतु ग्राम पंचायत स्तरावरून बिलच पाठविण्यात येत नाही आहे. बिल मिळत नसल्याने काही कंत्राटदारांनी कचरा गाड्या परत नेल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. परंतु त्यानंतरही बिलांच्या फायली ग्राम पंचायत स्तरावरून पाठविण्यात येत नाही आहे. 15 वित्त आयोगाचा निधी विशिष्ट वेळात खर्च करायचा आहे. परंतु तो न झाल्यास जिल्हा परिषदेची अडचण होणार असल्याचे सांगण्यात येते.

Bhandara Rain : भंडाऱ्यासह गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पूरस्थिती कायम, भंडारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; बसपची अर्ज भरण्याची रॅली अचानक रद्द; सेवानिवृत्त GST कमिशनर संजय थुल यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; बसपची अर्ज भरण्याची रॅली अचानक रद्द; सेवानिवृत्त GST कमिशनर संजय थुल यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज
Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच देवेंद्र फडणवीस यांना पत्र; चांदिवाल आयोगाच्या अहवालचा दाखला देत MPSC च्या प्रस्तावित न्यायिक चौकशीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले....
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच देवेंद्र फडणवीस यांना पत्र; चांदिवाल आयोगाच्या अहवालचा दाखला देत MPSC च्या प्रस्तावित न्यायिक चौकशीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले....
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget