Nagpur Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात मिळतेय 'सांस्कृतिक मेजवानी', दोन दिवसात 22 गणेशमंडळात उपक्रम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून यंदा सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून समितीने गायन, वादन, नृत्य, नाटक, गीतरामायण, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची आखणी केली आहे.
![Nagpur Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात मिळतेय 'सांस्कृतिक मेजवानी', दोन दिवसात 22 गणेशमंडळात उपक्रम Ganeshotsavat gets Cultural feast activities in 22 Ganesha Mandals in two days Nagpur Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात मिळतेय 'सांस्कृतिक मेजवानी', दोन दिवसात 22 गणेशमंडळात उपक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/7cdfacebd6e69b4b6e20b6801486e7cd166212898322389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूरः शहरात कुठे हास्य कविसंमेलन, 'गोष्ट एका लग्नाची' सारखे नाटक तर कुठे सुगम संगीत, देशभक्तीपर गीत, रांगोळी रेखाटन असा सांस्कृतिक उत्सव सध्या बघायला मिळत आहे. यंदाचा गणेशोत्सव सांस्कृतिक महोत्सव म्हणून साजरा करावा, या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने (cultural event) करण्यात आलेल्या आवाहनाला नागपुरातील गणेशमंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पुढचे 8 दिवस शहरात विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून यंदा (Nagpur) सांस्कृतिक गणेशोत्सवाची संकल्पना आकाराला आली आहे. त्यांच्या आवाहनानुसार खासदार सांस्कृतिक समितीने गायन (Singing), वादन, नृत्य, नाटक, गीतरामायण, देशभक्तीपर कार्यक्रम, कविसंमेलन आदी साहित्य, संस्कृतीसंबंधातील कार्यक्रमांची आखणी केली होती.
गणेशमंडळानी हे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या परिसरात साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी देशप्रेमी गणशोत्सव मंडळ नंदनवन कॉलनी व छाप्रु गणेशउत्सव मंडळ छाप्रू नगर येथे 'हास्य कविसंमेलन' घेण्यात आले. शेवाळकर गार्डन (Shevalkar Garden) सोसायटीमध्ये 'गोष्ट एका लग्नाची' नाटक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ छत्रपतीनगर येथे कैवल्याचे देणे, सार्वजनिक बालगणेशोत्सव मंडळ मानेवाडा येथे महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ, जागृतेश्वर गणेशोत्सव मंडळ गोळीबार चौक सुगम संगीत, न्यू सुभेदार बालगणेशोत्सव मंडळ सुभेदार लेआऊट येथे वीर गाथा क्रांतिकारी तर श्री संती गणेशोत्सव मंडळ (Santi Ganesh Utsav Mandal) सेंट्रल एव्हेन्यू व सार्वजनिक बालगणेशोत्सव मंडळ महाल येथे रांगोळी रेखाटन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांचा आनंद घेतला आणि हा उपक्रम उत्कृष्ट असल्याचे सांगत पसंतीची पावती दिली.
आज, शुक्रवारी ओम गणेशोत्सव मंडळ गोकुळपेठ (Gokulpeth), एम्प्रेस सिटी, विनायक महोत्सव समिती वाठोडा, मेकोसाबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रचना मधुकोश गणेशोत्सव मंडळ, देशप्रेमी गणेशोत्सव मंडळ, मयूर गणेशोत्सव मंडळ हनुमाननगर, बालमित्र गणेशोत्सव मंडळ भांडे लेआऊट, हनी अर्चना कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळ मेडीकल रोड, गणेशोत्सव समिती आकाशवाणी चौक व लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळ (Lakshminagar Ganesh Utsav Mandal) येथे विविध सांस्कृतिक पार पडले. पुढचे काही दिवस सांस्कृतिक गणेशोत्सवामुळे संपूर्ण नागपूरचे वातावरण सांस्कृतिक होऊन जाणार असल्याचे मत खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले (Anil Sole), उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, रेणुका देशकर, नितीन तेलगोटे, किशोर पाटील, मनीषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)