एक्स्प्लोर

नागपूरची अंतरा मेहता महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट!

नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत.

नागपूर : महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना संकटात नागपूरमधून एक चांगली आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी बातमी समोर आली आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्त्व सिद्ध केलंच आहेत. आता महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा मेहता असं त्यांचं नाव आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात 'फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. शिवाय 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा मेहता आता लढाईच्या मैदानात जाण्यासाठी तयार आहेत. अंतरा मेहता यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नागपूरची अंतरा मेहता महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट!

अंतरा मेहता यांचं प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झालं. तर अभियांत्रिकीचं शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली. मग त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी 'पिलेटस पीसी-7', दुसऱ्या टप्प्यात त्यांनी 'किरण एमके-1' हे लढाऊ विमान उडवले. मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे 'हॉक्स' या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

नागपूरची अंतरा मेहता महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट!

देशातील 10 महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहतांचा समावेश देशातील दहा महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहता यांचा समावेश झाला आहे. नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाष्ट्राच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या आहेत. आहे. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा या आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget