एक्स्प्लोर

औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा; वीजबिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने ग्राहकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा ग्राहकांना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी वीजबील आकारणी स्थगित करण्यात आली आहे.

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 22 मार्च ते 30 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. परिणामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. या सर्वांना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना शून्य रुपयाचे वीजबिल देण्यात येणार आहे. लॉकडाऊनंतर वास्तविक बिल आकारण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावी, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच व्यावसायिक ग्राहकांनी केली होती, ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे 2020 मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ

लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल

लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्टर/पीएफ सारखे सर्व प्रोत्साहन/सवलती उपलब्ध असतील. मार्च 2020 महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक 15 मे असणार आहे तर एप्रिल 2020 महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक 31 मे 2020 राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावीच्या उर्वरित पेपरसह नववी, अकरावी परीक्षा अखेर रद्द

सरासरी मासिक वापरावर वीडबिल

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहणार असून ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले आहे, त्या ग्राहकांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. तात्काळ वीजबिल भरणा, गो-ग्रीन सवलत, डीजिटल पेमेंटबाबतच्या सवलती ग्राहकांना नियमाप्रमाणे लागू असून मार्च महिन्याचे बिल 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिली आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

SSC Exam Cancelled | दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही

 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Nagpur Crime: खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
Nagpur Crime: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget