एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Diwali Rush: 'प्रशासनाविरोधात नाराजी', Mumbai-Goa Highway वर हजारो वाहने अडकली, कोकणचा प्रवास महागला
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई (Mumbai) आणि पुण्याहून (Pune) कोकणात (Konkan) जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली असून मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माणगाव (Mangaon) आणि इंदापूर (Indapur) परिसरात हजारो वाहने अडकून पडली असून, तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच या वाहतूक कोंडीमुळे कोकणात पोहोचण्यासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा चार ते पाच तास अधिक वेळ लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा फटका बसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गणेश म्हापरळकर, एबीपी माझा, रायगड.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















