Chandrashekhar Bawankule : राज्यात 97 हजार 443 बूथवर सक्षमीकरण अभियान राबविणार
प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह 900 प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. राज्यातही निवडणूका झाल्यास भाजप सज्ज असल्याचेही यावेळी बावनकुळे म्हणाले.
नागपूर : भाजप राज्यात बूथ सक्षमीकरण अभियान राबविणार आहे. एका बुथवर 30 कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 'हर घर झेंडा' उपक्रमाअंतर्गत भाजप कार्यकर्ते घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.
राज्यात 97 हजार 443 बूथ आहेत. प्रत्येक बूथव 30 प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जी यांच्यासह 900 प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
Rahul Gandhi : 'देशात चार लोकांची हुकुमशाही, लोकशाहीची हत्या सुरु'; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
आता राज्यभरातील जिल्ह्यातील हजार पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी महिनाभरात जाहीर होईल, त्यानंतर तालुकास्तरावर जाहीर केली जाईल. यातून बूथ सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी नमुद केले. याशिवाय हर घर झेंडा अभियानांतर्गत भाजप कार्यकर्ते प्रत्येक घरी झेंडा उपलब्ध करून देतील. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान भाजप कार्यकर्ता संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबविणार आहेत. बूस्टर डोससाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु भाजप कार्यकर्तेही या मोहिमेत भाग घेणार आहे. भाजपने नेहमीच जनहिताला प्राधान्य देत संघटनावर भर दिला आहे. ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.
राज्यात निवडणूक झाली तरी भाजप सज्ज
कोणत्याही निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चारशेवर लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने तसेच राज्यातही निवडणूक झाल्यास भाजप सज्ज असल्याचे माजीमंत्री आमदार बावनकुळे म्हणाले.