Teachers Constituency Election : नागपुरात 'या' 20 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार
Nagpur : उमेदवारांनी मिळविलेल्या मतांनुसार या 22 पैकी तब्बल 20 उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त होणार असल्याची स्थिती आहे. सध्या दुसऱ्या फेरीतील 6 हजार 360 मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे.
Teachers Constituency Election Result Nagpur Division : विधानपरिषद निवडणूकीची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक चर्चेत राहिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने शेवटी उमेदवार घोषित केला तर तळ्यात-मळ्यात करत महाविकास आघाडीने शेवटी अपक्ष उमेदवाराला आपले समर्थन जाहीर केले. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतिश इटकेलवार नॉट रिचेबल झाले होते. एकूण 22 उमेदवार निवडणूक रिंगणात असताना आजच्या निकालानंतर तब्बल 20 उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालं आहे.
तब्बल 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक असल्याने ते विभाजन करुन सत्तापक्षाचं गणित कर बिघडवणार नाही ना, अशी धास्ती नेत्यांमध्ये होती. मात्र आज मतमोजणीदरम्यान आलेल्या पहिल्या फेरीतील म्हणजेच 28 हजार मतांपैकी उमेदवारांनी मिळविलेल्या मतांनुसार या 22 पैकी तब्बल 20 उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालं आहे.
पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (अपक्ष) यांनी 14,069 मते मिळवली होती. तर भाजप समर्थित नागो गाणार (अपक्ष) यांनी 6,366 मते मिळवली. तर गेल्या निवडणुकीत फक्त 2 हजारांच्या सुमारास अंतराने पराभूत झालेले (समाजवादी पक्ष) (युनायटेड )चे राजेंद्र झाडे यांना फक्त 2742 मते मिळवता आली. यावेळी अजय भोयर (अपक्ष) हे उमेदवार वगळता इतरांना चार अंकी मतंही मिळवता आली नाही. भोयर यांनी पहिल्या फेरी अखेर 1090 मते मिळवली. तर आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) यांनी 618 मते मिळवली.
या तीन उमेदवाराला 11च्या खाली मते...
तर इतर उमेदवारांचे नाव आणि पक्ष किंवा अपक्ष कंसात नंतर मिळालेली मते पुढील प्रमाणे, सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) : 439 मते, रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष) : 365 मते, नरेंद्र पिपरे (अपक्ष) : 325 मते, प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष) : 303 मते, बाबाराव उरकुडे (अपक्ष) : 79 मते, प्रा सचिन काळबांडे (अपक्ष): 64 मते, उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष): 61 मते, सतिश इटकेलवार (अपक्ष) :60 मते, संजय रंगारी (अपक्ष):59 मते, इंजिनिअर प्रो. सुषमा भड (अपक्ष): 56 मते, निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष) : 51 मते, डॉ.विनोद राऊत (अपक्ष):46 मते, प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष) : 43 मते, राजेंद्र बागडे (अपक्ष) : 42 मते, रामराव चव्हाण (अपक्ष ): 11 मते, नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) : 08 मते तर श्रीधर साळवे (अपक्ष): यांना फक्त 4 मते मिळाली.
ही बातमी देखील वाचा...