एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपुरात गुन्हेगारी सुसाट; नववर्षातील पहिल्या 12 दिवसांत 5 जणांना जीवे मारलं

Nagpur : मागील दीड महिन्यापूर्वीच मोक्का गुन्ह्यातील 36 तर प्रतिबंधात्मक कारवाईतील 56 गुन्हेगार बाहेर आले आहे. तसेच या व्यतरिक्त काही गुन्हेगार शहरात सक्रिय असल्याने घटना वाढल्या आहेत.

Nagpur Crime News : नोव्हेंबरपासून नागपूर शहरातील कुख्यात गुंड आणि टोळीतील सदस्य मोठ्या प्रमाणात संचित रजेवर तुरुंगाबाहेर आले आहेत. यामध्ये जामीनावर सुटलेल्या मोक्कामधील आरोपींचाही समावेश आहे. मात्र शहरात मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस (Nagpur Police) प्रशासन अपयशी होत असल्याचे गेल्या दोन आठवड्यांपासून दिसून येत आहे. नववर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 5 जणांचा खून झाला आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेण्यासाठी शहरातील गुन्हेगारांवर 'वॉच' ठेवण्यासाठी बीट मार्शलच्या माध्यमातून सर्व्हिलन्स ठेवण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसात सातत्याने होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे या गुन्हेगारांवरील पोलिसांचे सर्व्हिलन्स सुटल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील टोळीयुद्ध संपवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोक्का आणि स्थानबद्धतेच्या कारवाईचा सपाटा लावला होता. त्यातून शहरातील कुख्यात गुंड आणि टोळीतील सदस्यांना अटक करीत, मोक्काची कारवाई केली. त्यातून शहरातील अनेक कुख्यात कारागृहात शिक्षा भोगत होते. याशिवाय वस्त्यांसाठी धोकादायक असलेल्या अनेक कुख्यात गुंडांना शहरातून हद्दपार करण्यासह सुरुवात केली होती.

त्यातून अनेक गुंड गावाबाहेर होते. मात्र, दीड महिन्यापूर्वीच मोक्का (Maharashtra Control of Organized Crime Act) गुन्ह्यातील 36 तर प्रतिबंधात्मक कारवाईतील (Preventive action) 56 गुन्हेगार बाहेर आले. या व्यतरिक्त काही गुन्हेगार शहरात अद्यापही सक्रिय आहेत. त्यातून शहरात पुन्हा टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी कारवाया सुरु होऊ नये यासाठी शहर पोलीस कटीबद्ध आहेत यासाठी पोलीस आयुक्तांनी योजना आखली होती. यानुसार गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गुन्हेगाराच्या घरी, परिसरात आणि वस्त्यांमध्ये बीट मार्शलच्या माध्यमातून दररोज भेट देऊन विचारपूस करत, कोण काय करत आहे, कुठे जातात आणि कुणाशी भेटतात यावरही नजर ठेवली जात होती.

टोळीयुद्धाने वाढवले पोलिसांचे टेन्शन

विशेष म्हणजे खून आणि टोळीयुद्धात (clashs between criminals) सहभागी असलेल्या गुंडांना दररोज सायंकाळी पोलिस ठाण्यात भेट द्यावी असे सांगितले होते. मात्र, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच खुनांनी शहर हादरले. यापैकी पाचपावलीतील दोन खून आणि कळमना, सक्करदरासह बुधवारी मध्यरात्री अजनी येथे झालेल्या खुनाने खळबळ उडाली. यात असलेल्या गुंडांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे असल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या सर्व्हिलन्सवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही बातमी देखील वाचा...

Teachers Constituency Elections : आमदारकीसाठी 27 शिक्षकांची तयारी; महाविकास आघाडीमधील ट्विस्टची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget