एक्स्प्लोर
काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय, मुख्यमंत्र्यांचं नाना पटोलेंवर तोंडसुख
'काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, नुसतं राजीनामे देणं आणि पक्ष बदलणं, एवढंच राजकारण नाना पटोले यांनी केलं असून मी का त्यांच्यासाठी माझ्या तोंडाची वाफ वाया घालवू?' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

नागपूर : काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील महाआघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. नितीन गडकरींच्या प्रचारासाठी नागपुरात आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी पटोलेंवर हल्लाबोल चढवला. नागपुरात भाजपचा प्रचार आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामावर केंद्रित होता. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करणं सुरु केलं आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी संयुक्तरित्या अनेक सभा घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. 'काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, भंडाऱ्यात जाऊन विचारा त्यांनी तिथे एक तरी प्रकल्प किंवा कारखाना आणला का? नुसतं राजीनामे देणं आणि पक्ष बदलणं, एवढंच राजकारण नाना पटोले यांनी केलं असून मी का त्यांच्यासाठी माझ्या तोंडाची वाफ वाया घालवू?' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. VIDEO | नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस लालची इंद्र : नाना पटोले | नागपूर | एबीपी माझा गेले काही दिवस नागपूरच्या मिहान प्रकल्प आणि मेट्रो रेल संदर्भात काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्या दाव्यांवर नितीन गडकरी भडकले. विलास मुत्तेमवार यांचं नाव न घेता, तुमच्या कर्तृत्वामुळेच नागपुरात आजवर विकास कामं झाली नव्हती. त्यामुळेच जनतेने मला निवडून दिलं आणि मी कामं करु शकलो, असं गडकरी म्हणाले. माझ्या विकासकामांमागे तुमच्या अपयशांचं श्रेय असल्याचं म्हणत गडकरींनी कोपरखळी मारली. नागपुरात भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे नाना पटोले रिंगणात उतरले आहेत. पटोले हे 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. VIDEO | गडकरींविरोधात काँग्रेसच्या नाना पटोलेंचा डीएमके प्लॅन कितपत यशस्वी होणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
आणखी वाचा























