एक्स्प्लोर

Buldhana Bus Accident : अनेक वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन, मात्र अपघातानंतर दंड ऑनलाईन भरला; विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर परिवहन विभागाची 'अर्थ'पूर्ण मेहरबानी?

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटी गावाजवळ अपघातग्रस्त आणि अपघातात 25 जणांचा जीव घेणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर परिवहन विभागाची अर्थपूर्ण मेहेर नजर होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटी गावाजवळ अपघातग्रस्त आणि अपघातात 25 जणांचा जीव घेणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर (Vidarbha Travels) परिवहन विभागाची अर्थपूर्ण मेहेर नजर होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे अपघात झालेल्या त्याच बसवर यापूर्वी अनेक वेळेला वाहतूक नियमांचा (Traffic Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी चालान (दंड) झालेले आहेत. मात्र संबंधित बस कंपनीने कधीही ते चालान (दंड) भरले नाही. अपघात झाल्यानंतर मात्र अवघ्या काही तासातच सर्व चालान (दंड) ऑनलाईन भरण्यात आले. त्यामुळे परिवहन विभागाचे अधिकारी या बसच्या वारंवार वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी का दुर्लक्ष करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अपघात होऊन 25 जणांचे जीव घेणाऱ्या बस विरोधातील गेल्या दोन वर्षात लागलेले दंड

  • 5 फेब्रुवारी 2021 रोजी संबंधित बसला पीयूसी नसल्याच्या कारणामुळे बाराशे रुपयांचा चालान आकारण्यात आला होता.
  • 24 ऑगस्ट 2022 रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या याच बसला फिटनेस प्रमाणपत्र न दाखवणे आणि अयोग्य लाईटचा वापर करणे यासाठी 4 हजार 500 रुपयांचे दंड लागले होते.
  • 11 ऑक्टोबर 2022 रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या याच बसला फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याप्रकरणी तब्बल 23 हजार 500 रुपये, स्पीड गव्हर्नर नीट काम करत नाही यासाठी 2 हजार रुपये, अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही यासाठी 500 रुपये, आपात्कालीन दरवाजा नीट काम करत नाही म्हणून 2 हजार रुपये असे चालान आकारण्यात आले होते.
  • जानेवारी 2023 मध्येही नो पार्किंगमध्ये बस उभी केल्याप्रकरणी 500 रुपयांचा दंड लागला होता.
  • 12 जून 2023 रोजी ही या बसला विविध नियमांच्या उल्लंघन प्रकरणी 11 हजार 200 रुपयांचे दंड लावण्यात आला होता. तेव्हा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले, वाहन चालकाने योग्य ड्रेस घातले नाही, बसच्या विंडोचे काही काच तुटलेल्या आहेत तसेच बस ठरलेल्या ठिकाणी न थांबवता प्रवासादरम्यान मध्येच थांबवणे अशा कारणांसाठी हा दंड आकारला  होता.
  • विशेष म्हणजे हे सर्व चालान अपघात झाल्यानंतर एक जुलै 2023 रोजी दुपारी 1:15 पासून 1:23 दरम्यान ऑनलाईन भरण्यात आले आहेत.

समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 जणांचा मृत्यू

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा शनिवारी समृद्धी महामार्गावर (Samrudhi Highway) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले. बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली त्यानंतर काही अंतरावर जाऊन पलटी झाली आणि तिने अचानक पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.  

हेही वाचा

Buldhana Accident: अपघातानंतर शोक व्यक्त पण त्यानंतर मात्र दुर्लक्ष? बुलढाण्यातील अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena : शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले होते - शिंदेJayant Patil on BJP : अजित पवारांना फाईल दाखवून 10 वर्ष ब्लॅकमेल केलं - जयंच पाटीलABP Majha Headlines :  5 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar : महायुतीचे अधिक आमदार निवडून आणायचे आहेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Embed widget