Buldhana Accident: अपघातानंतर शोक व्यक्त पण त्यानंतर मात्र दु्र्लक्ष? बुलढाण्यातील अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार
Buldhana Accident: बुलढाण्यात समृद्धी महामर्गावार झालेल्या अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तींवर आज सामूहिक अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र यावर अद्याप एकही राजकीय प्रतिक्रिया आली नाही.
Buldhana Accident: बुलढाण्यात (Buldhana) खासगी बसला झालेल्या अपघातातील मृतांवर सामूहिक अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. परंतु 25 मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तरीही सर्व 25 मृतदेहांवर रविवारी (2 जुलै) रोजी शोकाकुल वातावरणात सामूहिक अंतिम विधी करण्यात आले आहेत. बुलढाण्यामधल्या त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार या मृतांवर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. यामधील 24 जणांवर हिंदू पद्धतीने अग्नी देऊन अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. तर यातील एका मुस्लिम महिलेवर बुलढाण्यातील स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा परिसरात समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. यावर फॉरेन्सिक पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी येण्यास जवळपास पाच दिवसांचा अवधी लागणार होता. त्यामुळे सर्व मृतदेहांवर सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.