BJP leader Murdered in Nagpur: नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय
राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगव परिसरात आढळून आला. मध्यरात्री तीन वाजता ही घटनाा घडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
नागपूर: राज्यात हत्यांचे सत्र सुरूच आहे. नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर शहरात (Nagpur Murder) खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगव परिसरात आढळून आला. मध्यरात्री तीन वाजता ही घटनाा घडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय
राजू डेंगरे हे ग्रामपंचायत निवणुकीतले विजयी उमेदवार होते. त्यांच्या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. कुही पोलीस पुढील तपास करत आहेत. भाजप पदाधिकारी राजू डोंगरे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे नागपूरात शहरात खळबळ उडाली आहे. राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.