एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule: शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत, फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न: बावनकुळे

Maharashtra Politics: चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवार यांच्यावर टीका. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना खलनायक करण्याचा प्रयत्न. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे, ते चांगलं नाही. जनता सुज्ञ आहे

नागपूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले. 

निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे, ते चांगलं नाही. जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करणे, अशी काही आंदोलनं निर्माण करत आहेत, ज्यामधून तेढ निर्माण होईल. समाजाला विचलित ठेवण्याचे काम काही लोक करत आहेत. राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते गेले नाहीत. ते बाहेर बोलून या मुद्द्यावरुन राजकारण करत आहे. काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतात. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. तेव्हा हे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार असल्याचा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न: चंद्रशेखर बावनकुळे

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या अनुषंगाने बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलले असतील. देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केले जात आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलले असतील देवेंद्र फडणवीस यांना विलन केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयातील  भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. पण लोक सुज्ञ आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकालाही विरोध झाला होता, तोच वर्ग आज महाराष्ट्रातील ऐक्याला धोका निर्माण करतोय: शरद पवार

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget