एक्स्प्लोर

Nagpur : बांगलादेशमधील उलथापालथीचा विदर्भातील संत्रा उत्पादकांना फटका, निर्यात रखडली; लाखो टन संत्र्यांचं करायचं काय?

Orange Export Stopped : अवकाळी संकटानंतर आता नागपूरच्या संत्र्यांवर दुसऱ्या संकटाचे ढग दाटले आहेत. बांगलादेशच्या अस्थिर परिस्थितीचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. भीषण स्थितीला घाबरुन सध्या एकही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही.

नागपूर : महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलं आहे. नागपूर (Nagpur) आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचं (Oranges) उत्पादन होतं. बांगलादेशमधून या संत्र्यांना मोठी मागणी असते. दर हंगामात बांगलादेशला अडीच लाख टन संत्र्याची निर्यात होते. पण आता बांगलादेशमधील अराजक स्थितीमुळे (Bangladesh Crisis) संत्र्यांची निर्यात रखडली आहे, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे विदर्भातून (Vidarbha) बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचं यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.

एकही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही

वैदर्भीय संत्रा उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी आणि निर्यातदार बांगलादेशमधील अराजक परिस्थितीमुळे सध्या चिंतेत पडले आहेत. बांगलादेशमध्ये गेले काही वर्षं सातत्याने विदर्भातून मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत होती. गेल्या काही वर्षात बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर भरमसाठ आयात शुल्क लावले असले, तरी बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्याची मागणी काही कमी झाली नव्हती. त्यामुळे विदर्भातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्रा बागांमध्ये लाखो रुपये गुंतवून निर्यात योग्य, दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी खास प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता बांगलादेशमधील अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे बांगलादेशातील एक ही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही.

'बाजारपेठ शोधण्यास केंद्र सरकारने मदत करावी'

स्थानिक व्यापारी देखील बांगलादेशमध्ये संत्रा निर्यातीसाठी घेऊन जाण्यास तयार नाही, त्यामुळे विदर्भात उत्पादित होणाऱ्या लाखो टन संत्र्याचा यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. अजूनही संत्र्याचा उत्पादन बाजारात येण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ऑक्टोबर महिन्यात संत्रा बाजारात येण्यास सुरुवात होईल. यंदा संत्र्याचा बहारही चांगला असल्याने दमदार उत्पादन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येईल?

बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारा संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकतो, असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाटतंय. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे दोघेही संत्रा उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील खासदार आहेत. त्यामुळे दोघांनी एकत्रित प्रयत्न करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येऊ घातलेल्या संकटातून बाहेर काढावं, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

Vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणूक दिवाळीच्या आधी की नंतर? 'या' तारखेला निकाल लागण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Embed widget