एक्स्प्लोर

Landslide : राज्यातील संभाव्य धोकादायक ठिकाणांच्या अभ्यासाबद्दल मदत व पुनर्वसन विभाग गंभीर नाही?

Landslide : राज्यात दरड कोसळू शकते अशा संभाव्य धोकादायक ठिकाणांच्या अभ्यासाबद्दल राज्याचं मदत व पुनर्वसन विभागच गंभीर नसल्याचं समोर आलं आहे.

Landslide : सरकार माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीनंतर आणखी काही गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे राज्यात दरड (Landslide) कोसळू शकते अशा संभाव्य धोकादायक ठिकाणांच्या अभ्यासाबद्दल राज्याचं मदत व पुनर्वसन विभागच (Ministry of Relief & Rehabilitation) गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (Maharashtra Remote Sensing Application Centre) या तज्ज्ञ संस्थेसोबत अनेक वेळेला बैठक होऊनही दरड कोसळू शकते अशा संभाव्य ठिकाणांचा अभ्यास करण्याचं काम मदत व पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरसह इतर कुठल्याही संस्थेला सोपवलेलं नाही.

"राज्य सरकारने परवानगी दिली तर आम्ही एका वर्षाच्या आत राज्यातील दरड कोसळण्यासंदर्भात संभाव्य धोकादायक ठिकाणांचं डिटेल मॅपिंग म्हणजेच "लँडस्लाईड हॅझार्डस झुनोशन मॅप" तयार करुन सरकारला अहवाल सोपवू शकतो. त्या संदर्भातला तंत्रज्ञान आणि क्षमता आमच्याकडे आहे," महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर म्हणजेच MRSAC चे प्रमुख दिलीप कोलते यांनी एबीपी माझालाही माहिती दिली आहे.

'मदत व पुनर्वसन विभागासोबत दोन वेळा बैठका, पण फलित नाही'

धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात MRSAC ने राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाला एक प्रस्तावही पाठवला असून विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दरड कोसळू शकतात अशा संभाव्य ठिकाणांचा सखोल मॅप तयार करण्याच्या विषयावर दोन बैठकाही झाल्या आहेत. मात्र, या बैठकांचं काहीही फलित निघालेलं नाही. त्यामुळे अनेक वेळेला चर्चा होऊनही मदत व पुनर्वसन विभागाने दरड कोसळू शकते अशा संभाव्य धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करण्याचा काम महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर किंवा अन्य कोणत्याही संस्थेला सोपवलेलं नाही. त्यामुळे सरकार माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीनंतर आणखी काही गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या जाण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

VIDEO : Irshalgad Landslide : कडक ऊन आणि तुफान पाऊस, जमिनीची धूप झाल्यानं इर्शाळवाडीवर दरड कोसळली?

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर

रायगडमधील इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला तीन दिवस झाले आहेत. काल (21 जुलै) दिवसभरात सहा मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. अजून 86 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. इर्शाळवाडीत बुधवारी दरड कोसळली आणि48 पैकी 17 घरे गाडली गेली. बचावकार्य गुरुवार सकाळपासूनच सुरु झालं. पण मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. शिवाय पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने काल इर्शाळवाडीत एनडीआरएफचे जवान वगळता सर्वांना वर येण्यास मनाई करण्यात आली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget