एक्स्प्लोर

हजारो रुपयांची रोकड सोडून 10 लिटर दुधाची लूट! आरोपींना पकड्यासाठी पोलिसांची दमछाक

गुन्ह्यांच्या बाबतीत अजब नागपुरातील गजब घटना. नकली बंदुकीचा धाक दाखवून 10 लिटर दुधाची लूट केली. आश्चर्य म्हणजे दुधाच्या स्टॉलवर हजारोंची रोकड कॅशबॉक्समध्ये असताना फक्त दूध लुटून नेले. गवतातून सुई शोधून काढावी तसे पोलिसांनी शेकडो वाहन चालकांचा तपास करत तीन तरूणांना शोधले. तेव्हा तिघांनी लुटीचं अजब कारण पुढं केलं.

नागपूर : नागपुरात गुन्हा कसा आणि का घडेल याचा काही नेम नाही. छोट्या छोट्या कारणांसाठी रक्त सांडणाऱ्या नागपुरात एका अजब गजब कारणासाठी लुटीची घटना घडली आहे. ही लूट काही सोन्या चांदीची किंवा मोठ्या रकमेची नाही. तर ही लूट आहे अवघ्या 10 लिटर दुधाची. होय 10 लिटर दूध. लूट घडलेल्या दुधाच्या स्टॉल वर हजारो रुपयांची रोकड असतानाही बंदूक घेऊन आलेल्या तीन तरुणांनी त्या रोकडला हात सुद्धा लावला नाही. फक्त 10 लिटर दुधच लुटले.

लुटीच्या या अजबगजब घटनेचा उलगडा लावायला पोलिसांना तीन दिवसांत सुमारे 50 जणांना शोधावे लागले. अनेकांची चौकशी करावी लागली. जेव्हा पोलीस हजारो रुपये सोडून 10 लिटर दूध लुटणाऱ्या तीन लुटारूंपर्यंत पोहोचले तेव्हा कुठे या 10 लिटर दुधाच्या आश्चर्यकारक लुटीमागचं तेवढचं आश्चर्यकारक कारण समोर आलं आहे.

लॉकडाऊन काळात नोकऱ्या गमावणाऱ्या दोन तरुणी नागपुरात देहविक्री व्यवसायात

हजारो रुपयांची रोकड सोडून दुधाची लूट नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत वंजारी नागपूर भागात महाराष्ट्र शासनाच्या शासकीय दूध योजनेचा एक स्टॉल आहे. अजनी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या स्टॉलचा परिसर पहाटेच्या सुमारास निर्जन असतो. या स्टॉलवर 60 वर्षांचे रामकृष्ण शेळके नावाचे वृद्ध कामाला आहेत. 11 जूनच्या पहाटे चार वाजता रामकृष्ण त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमानुसार दुधाच्या गाडीतून केरेट खाली उतरविताना 8340 या क्रमांकाच्या एक्टीव्हावर तीन तरुण तिथे आले. आपापसात "निकाल रे अपनी बंदूक अभी एक का गेम बजाए है. इसका भी गेम बजाते है" असे संभाषण सुरु केले. तेवढ्यात एकाने खिशातून बंदूक काढण्याचा बनाव करत रामकृष्ण यांच्याकडे धाव घेतली. वृद्ध रामकृष्ण त्यामुळे घाबरून गेले. त्यांच्या या भीतीचा फायदा घेत तिघांनी दुधाच्या स्टॉल वरून 10 लिटर दूध उचलून नेले. आश्चर्यकारक बाब म्हणजे स्टॉलवर दुधाच्या खरेदीसाठीचे हजारो रुपये कॅश बॉक्समध्ये असताना तिघांनी त्याला हातही लावला नाही. फक्त 10 लिटर दुधासह पळ काढला.

बंदुकीचा धाक दाखवून लूट घाबरलेल्या रामकृष्ण यांनी घटनेची तक्रार पोलिसांना केली. वृद्ध माणसाकडे हजारो रुपये असताना बंदूक घेऊन आलेले लुटारू ती रोकड न लुटुन न जाता फक्त 10 लिटर दूध घेऊन का गेले या विचाराने पोलीसही चक्रावले. तसेच या लुटीत तथाकथित लुटारूंनी बंदुकीचा वापर केला असल्याची तक्रार आली असल्याने पुढे आणखी काही गुन्हा घडू नये हे लक्षात घेत पोलिसांनी गंभीर्याने या अजबगजब घटनेचा तपास सुरु केला. चारशे रुपयांच्या दुधाच्या या लुटीच्या घटनेबद्दल एकच धागा पोलिसांकडे होता आणि तो म्हणजे लूट झालेल्या स्टॉलचे कर्मचारी रामकृष्ण शेळके यांनी एक्टिव्हाचे 8340 असे अखेरचे फक्त चारच नंबर पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी आरटीओकडून नागपुरात अस्तित्वात असलेल्या 8340 या क्रमांकाच्या सर्व एक्टीव्हा किंवा तत्सम गाड्यांची यादी मागितली.

नागपुरात गुंडांची मग्रुरी, मध्यरात्री बर्थडे सेलिब्रेशन, समजावणाऱ्या नागरिकांच्या घरावर दगडफेक करत मारहाण

आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची दमछाक आरटीओने वेगवेगळ्या सिरीजमध्ये 50 पेक्षा जास्त दुचाकींचे नंबर 8340 असल्याची यादी दिली. पोलिसांनी त्या यादीप्रमाणे 8340 या क्रमांकाच्या प्रत्येक गाडी मालकाला शोधून विचारपूस सुरु केली. मात्र, दुधाच्या लुटीमागचं खरं कारण आणि खरे आरोपी काही समोर येत नव्हते. तीन दिवस शोध घेतल्यानंतर अखेरीस पोलीस अभिजित ढोके, गौरव पांडे आणि कुशल सरणकर यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांना थोडा पोलिसी खाक्या दाखविला आणि हे तरुण पोपटासारखे बोलू लागले. तिघांचे कोणतेही गुन्हेगारीचे जुने रिकॉर्ड नाही. त्यामुळे बंदुकीचा धाक दाखवत 10 लिटर दुधाची लूट का केली, अशी विचारणा जेव्हा पोलिसांनी केली. तेव्हा अत्यंत हास्यास्पद कारण या तिघांनी पोलिसांना सांगितले.

दूध पिऊन तिघांची त्या दिवसाची भूक तर शमली मात्र... पहाटे अचानक झोप उघडली. जोरात भूक लागली होती. एवढ्या सकाळी घरचे नाष्ता वगैरे बनवून देणार नव्हते. तसेच एवढ्या पहाटे दुधाचे स्टॉल वगळून दुसरे काहीच उघडे नसल्यामुळे दूध पिण्याकरिता दूध लुटून नेल्याचे कारण तिन्ही तरुणांनी पुढे केले. तिघांनी जी बंदूक काढण्याचे बनाव करत दुधाची लूट केली होती ती बंदूक ही बनावट निघाली आहे. पोलिसांनी तिघांना लुटीच्या प्रकरणात अटक केली असून भूक लागली म्हणून लूट करणारे हे तिघे तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दूध पिऊन तिघांची त्या दिवसाची भूक तर शमली. मात्र, 400 रुपयांच्या या लुटीच्या प्रकारणामुळे नागपूर पोलिसांची बरीच दमछाक झाली.

Nagpur Biryani Party | बिर्याणी पार्टीवरुन नागपूर मनपा आयुक्त-पोलिस आमनेसामने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget