Tukaram Munde: तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून नागपुरात मोर्चा; 'डरो मत, वॉक फॉर तुकाराम' म्हणत काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा एल्गार
Morcha For Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली असली, तरी नागपुरात आज तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थही एक मोर्चा काढण्यात आला आहे.

Morcha For Tukaram Munde नागपूर : तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांना निलंबित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली असली, तरी नागपुरात आज तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थही एक मोर्चा काढण्यात आला आहे. मध्य नागपुर मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला असून या मोर्चाला "डरो मत, वॉक फॉर तुकाराम" अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी आणण्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नुकतेच विधानसभा सभागृहात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ, अशी धमकी आल्याचं म्हटलं. तसेच, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडे ठेऊन घेतला होता, यासंदर्भात आपण लक्षवेधी दिली असून त्यामध्ये सविस्तरपणे लिहिण्यात आल्याचं सांगितलं. तसेच, त्यांच्यावरील लक्षवेधीमुळे आपणास दोन जणांनी फोन करुन धमकी दिली. नागपूर (Nagpur) अधिवेशनासाठी आलो असता, मला धमकीचे फोन आल्याचंही त्यांनी म्हटलं.
Nagpur News: दटके विरुद्ध शेळके राजकीय विरोधकांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा
दरम्यान, नागपुरात आज तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थही एक मोर्चा काढण्यात आला. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशवंत स्टेडियम ते टेकडी रोड असा मोर्चा काढला आहे. विशेष म्हणजे मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यासोबत मिळून तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दटके यांचे राजकीय स्पर्धक राहिलेल्या बंटी शेळके यांनी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. त्यामुळे दटके विरुद्ध शेळके या राजकीय विरोधकांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Nagpur News : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली; यशवंत स्टेडियम मध्येच घातलं लोटांगण
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन विविध शासकीय कार्यालयामध्ये मानधन तत्वावर नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तरुणांना रोजगार देण्यात आले नाही, असा आरोप करत बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी संघटनेच्यावतीने लोटांगण मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी स्टेडियमच्या बाहेर परवानगी नाकारल्याने यशवंत स्टेडियममध्येच हे आंदोलन सुरू करण्यात आलं. यात हजारोच्या संख्येने बेरोजगार तरुण तरुणी सहभागी झालेत.
हेही वाचा
























