मुंबईत क्रिकेट सामन्यादरम्यान तरुणाचा मृत्यू
हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांसाठी बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. कामाचा अतिताण, वाढत चाललेलं फास्ट फुड कल्चर, जेवणाच्या अनियमित वेळा, अनियमित व्यायाम यामुळे तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याचं डॉक्टर सांगतात.

मुंबई : भांडूपमध्ये क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. वैभव केसरकर असं 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तब्येत बिघडल्यानंतर वैभवला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
भांडूपमध्ये 23 डिसेंबरला टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गावदेवी पॅकर्स या संघातून फलंदाजी वैभव केसरकर फलंदाजी करत होता. मात्र अचानक छातीत दुखू लागल्यानं त्याने फलंदाजी सोडून क्षेत्ररक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु छातीत दुखणे कमी न झाल्याने त्याने डाव अर्धवट सोडावा आणि तो तसाच बाहेर जाऊन एका खुर्चीवर बसला.
मात्र तरीही छातीत दुखणं न थांबल्यामुळे त्याला जवळच असलेल्या भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला कार्डियाक अटॅक आल्याचं स्पष्ट झालं. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गेल्या अनेक वर्षापासून वैभव हा टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये भांडूप तसेच आसपासच्या परिसरातील विविध संघांतून खेळत होता. काही महिन्यांपर्वीच तो त्याच्या कुटुंबियासहीत दिवा येथे राहायला गेला होता. परंतु क्रिकेट वेडापायी त्याची भांडुपशी नाळ कधी तुटली नाही. त्याच्या अचानक एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबीयांसहित मित्रांना देखील धक्का बसला आहे.
हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांसाठी बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. कामाचा अतिताण, वाढत चाललेलं फास्ट फुड कल्चर, जेवणाच्या अनियमित वेळा, अनियमित व्यायाम यामुळे तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याचं डॉक्टर सांगतात.
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती






















