एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गे डेटिंग साईटवर ओळख, 24 वर्षीय तरुणाची 75 हजारांना लूट
मुंबई : सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख झालेल्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा असतील याचा नेमका अंदाज बांधणं कठीण असतं. गे डेटिंग साईटवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटणं मुंबईतील एका 24 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं. 75 हजारांचा आयफोन आणि डेबिट कार्डसह तरुणाची लूट झाल्याचं वृत्त आहे.
नरिमन पॉइंटजवळ एका पिझ्झा आऊटलेटमध्ये शेफ असलेल्या तरुणाची गे डेटिंग साईटवरुन एकाशी ओळख झाली. दोघांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. घाटकोपरला पोहचल्यानंतर आरोपी पीडित तरुणाला रेल्वे रुळांजवळ घेऊन गेला. त्यावेळी आरोपीचे दोन सहकारी आले आणि तरुणाजवळील महागडा आयफोन आणि दोन डेबिट कार्ड घेऊन त्यांनी पोबारा केला. कार्ड वापरुन आरोपींनी 21 हजारांच्या वस्तू विकत घेतल्या.
पोलिसांनी 24 वर्षीय जावेद शेख उर्फ अरबाज, 29 वर्षीय एजाझ खान आणि 37 वर्षीय जाफर अन्सारी या विक्रोळीत राहणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अशाच पद्धतीने लूट झालेल्या एका पोलिस तरुणाची माहिती पोलिसांना मिळाली आणि आरोपींचा छडा लागला. तिघांवर चोरी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणांशी ओळख करुन लुटणारा मुख्य आरोपी अरबाज आहे. मात्र तो समलिंगी नसून केवळ तरुणांना लुटण्याच्या उद्देशाने गे डेटिंग साईटचा गैरवापर करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement