एक्स्प्लोर
Advertisement

CCTV : मुंबईत शिवसैनिकांची गुंडगिरी, तरुणाला बेदम मारहाण
विशालच्या स्टॉलची तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांनी त्याला बांबूच्या काठीने मारहाण करत तो राहत असलेल्या बिल्डिंगपर्यंत आणलं.

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी भागात शिवसैनिकांची गुंडगिरी पाहायला मिळाली. शिवसैनिकांनी विशाल पांडे या तरुणाला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, मारहाण करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचा प्रभादेवीतील शाखाप्रमुख शैलेश माळी आणि त्याचा मुलगा मंदार माळीही सहभागी होता. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
प्रभादेवीतील उर्वशी बिल्डिंगमध्ये पांडे कुटुंबीय राहतं. घरामध्ये विशाल पांडे हा आई आणि तीन भावंडांसह राहतो. आई कायम आजारी असते. घराला हातभार लागावा म्हणून विशालने सिद्धिविनायक मंदिराच्या मागे फ्रँकीचा स्टॉल लावला होता. पण दुसऱ्या दिवशीच काही शिवसैनिकांनी विशालला स्टॉल का लावला, असा जाब विचारण्यास सुरुवात केली आणि त्याचा स्टॉल तोडला.
स्टॉलची तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांनी विशालला बांबूच्या काठीने मारहाण करत तो राहत असलेल्या बिल्डिंगपर्यंत आणलं. जे लोक विशालला वाचवायला पुढे आले, त्यांनाही शिवसैनिक मारहाण करत होते. निखाल पांडे हा विशालचा भाऊ त्याला वाचवायला पुढे आला, तर त्यालाही कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली.
शिवसैनिकांच्या या गुंडगिरीत विशाल पांडे, त्याचा भाऊ निखील पांडे जखमी झाले आहेत, तर दोघांना वाचवायला पुढे सरसावलेल्या त्यांच्या आईलाही दुखापत झालीय.
आम्ही उत्तर भारतीय असल्याने आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप विशालची बहीण प्रियंका हिने केला आहे. शिवसेना शाखाप्रमुख शैलेश माळी, त्याचा मुलगा मंदार माळी, शेखर भागवत, संतोष म्हात्रे, कैळाश पाटील, दीपक बोरकर या शिवसैनिकांना आपल्या भावाला मारहाण केली, असाही आरोप प्रियंकाने केला आहे.
सध्या दादर पोलिस ठाण्यात गुंडगिरी करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शाखाप्रमुखाचाही मारहाण करणाऱ्यांमध्ये समावेश असल्याने पोलिस किती तातडीने कारवाई करतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
जालना
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
