(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना संसर्गावर औषध शोधल्याचा योगगुरु रामदेवबाबा यांचा दावा!
कोरोना संसर्गावर औषध शोधल्याचा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार या औषधामुळे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे.
मुंबई : कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कोरोना विषाणू संसर्गावर औषध सापडलं असून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के असल्याचा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी केला आहे. एबीपी माझ्याच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्या औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे.
जगभरात आतापर्यंत 75 लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. भारतातही या कोरोन बाधित रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. जगात अनेक देश कोरोनाच्या लस आणि औषधावर प्रयोग करत आहेत. भारतातही अशा प्रकारचे प्रयोग सुरू आहे. अशातच योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले रामदेवबाबा यांनी कोरोनावर औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. या औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली असून काही दिवसांतच त्यांच्या मानवी चाचणीचेही निकाल हाती येतील, असा दावा रामदेवबाबा यांनी केला.
सामाजिक समानता अद्यापही आपल्यासाठी 'स्वप्नवत'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाची खंत
या औषधाने रुग्णांची रिकव्हरी मोठी या औषधांने होणारी रुग्णांची रिकव्हरी मोठी आहे. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करत आहे. याच वैज्ञानिकांनी मिळून कोरोना संसर्गावर औषध शोधल्याचे त्यांनी सांगितले. रामदेव बाबा यांचा हा दावा खरा असेल तर नक्कीच सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
राज्यात आज 3427 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज 3427 रुग्णांची भर पडली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये आज एकूण 1550 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजपर्यंत एकूण 49 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 113 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Day With Corona Warriors | कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसोबत एक दिवस! पोलीस कर्मचारी तेजस सोनावणे