एक्स्प्लोर
आम्ही अल्टीमेटच आहोत, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला खोचक टोला
त्यामुळे सरकारमध्ये राहायचं की नाही, या निर्णयाच्या आम्ही अगदी जवळ आलोय, असा निर्वाणीचा इशाराही खासदार संजय राऊत यांनी दिला होता.

मुंबई : आम्ही अल्टीमेटच आहोत, अशी तिरकस टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिली आहे. शिवसेनेच्या शेवटच्या अल्टीमेटमच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यातील सत्तेत सातत्याने मिळणारी सापत्न वागणूक यामुळे शिवसेनेच्या गटात मोठी नाराजी आहे. शिवसेना आमदारांची विकासकामं होत नसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना शेवटचं अल्टीमेटम देणार असल्याचं मातोश्रीवरील बैठकीत ठरलं. त्यामुळे सरकारमध्ये राहायचं की नाही, या निर्णयाच्या आम्ही अगदी जवळ आलोय, असा निर्वाणीचा इशाराही खासदार संजय राऊत यांनी दिला होता. मात्र शिवसेनेतील एक गट सत्तेतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचंही कळतं. त्यामुळे कात्रीत अडकलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेने आणखी खिजवलं आहे. संबंधित बातम्या शिवसेनेच्या बैठकीत नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांना शेवटचं अल्टिमेटम उद्धव ठाकरेंसमोर सेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी, निलम गोऱ्हे रडल्या!
आणखी वाचा























