तरुणाचा जीव वाचवण्यासाठी कामगाराची थेट समुद्रात उडी, विरार जेटीवर थरार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
विरार जेटीवर आज दुपारी एक थरारक घटना घडली आहे. या घटनेने अनेकांच्या अंगावर काटा आणला आहे.
विरार : विरार जेटीवर आज दुपारी एक थरारक घटना घडली आहे. या घटनेने अनेकांच्या अंगावर काटा आणला आहे. मद्यधुंद अवस्थेत जेटीच्या टोकावर फिरत असलेल्या एका व्यक्तीचा अचानक तोल जाऊन तो खोल समुद्रात पडला. काही क्षणांतच त्याचा जीव धोक्यात आला होता. पण याचवेळी रो-रो सेवेत कार्यरत असलेल्या कामगाराने क्षणाचाही विलंब न करता थेट समुद्रात उडी घेत, या तरुणाचा जीव वाचवला आहे. कामगाराच्या या धाडसाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
मद्यधुंद अवस्थेत जेटीच्या टोकावर फिरत असलेल्या एका व्यक्तीचा अचानक तोल जाऊन तो खोल समुद्रात पडल्याची घटना घडली होती. यानंतर जेटीवर रो-रो सेवेत कार्यरत असलेले आदेश नाईक यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात उडी घेतली. प्रचंड धैर्य आणि शिताफीने त्यांनी बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आदेश नाईक यांचे धाडस पाहून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. “त्यांनी वेळेत मदत केली नसती, तर मोठी दुर्घटना घडली असती,” अशा भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या. आदेश नाईक यांनी एका कुटुंबाचा आधार वाचवत खऱ्या अर्थाने ‘रिअल लाईफ हिरो’ची ओळख निर्माण केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Raigad : क्लासची ट्रिप जिवावर बेतली, रायगडला फिरायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, मृतामध्ये शिक्षकाचा समावेश
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी






















