एक्स्प्लोर
Advertisement
17 वर्षीय अल्पवयीन मुलाशी लग्न, महिलेच्या जामीन अर्जावर उद्या निकाल
महिलेची पाच वर्षांची मुलगी असून तीदेखील सध्या भायखळा जेलमध्ये तिच्या आईसोबतच आहे. अल्पवयीन मुलाच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेचा याआधी दोनवेळा घटस्फोट झालेला आहे. तसेच आपल्या मुलाचं वय लग्नाच्यावेळी 17 वर्ष 8 महिने असल्याचं सांगितलं आहे.
मुंबई : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या 22 वर्षीय महिलेच्या जामीन अर्जावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालय आपला निकाल देण्याची शक्यता आहे. सदर महिलेवर पोक्सो, अपहरण आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आजची सुनावणी उद्या शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. उद्या यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन मुलाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर वर्षभराच्या तपासानंतर या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेची पाच वर्षांची मुलगी असून तीदेखील सध्या भायखळा जेलमध्ये तिच्या आईसोबतच आहे. अल्पवयीन मुलाच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेचा याआधी दोनवेळा घटस्फोट झालेला आहे. तसेच आपल्या मुलाचं वय लग्नाच्यावेळी 17 वर्ष 8 महिने असल्याचं सांगितलं आहे.
एकेदिवशी ही महिला रात्री अचानक मुलाच्या घरी आपल्या नातेवाईकांसह दाखल झाली. तुमच्या मुलानं माझ्याशी लग्न केलं असल्यानं आता मी याच घरात राहणार असल्याचा दावा केला. मुलाच्या आईवडिलांनी याला विरोध करतास महिलेनं तिच्या नातेवाईकांसह त्यांना दमदाटी केली व स्वत:ला इजा करून घेण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मुलगाही आईवडिलांचं घर सोडून गेला. या सगळ्याचा मुलाच्या मानसिकतेवर इतका परिणाम झालाय की तो दहावीच्या परिक्षेत यंदा नापास झाला.
या महिलेनं जामीनासाठी अर्ज करताना म्हटलंय की नवऱ्याशी असलेलं आपलं नात हे दोघांच्या सहमतीनं आहे. तसेच मुलगा लग्नाच्यावेळी अल्पवयीन असल्याचा तक्रारदार आईचा दावा खोटा असल्याचाही दावा केला आहे. तक्रारदार महिलेला तीन मुलं आहेत. ज्यातील मोठी मुलगी 20 वर्षांची असून त्यानंतरची दुसरी मुलगी ही 18 वर्षांची आहे. मग तिसरा मुलगा 17 वर्ष 8 महिन्यांचा कसा असू शकतो? असा दावा केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement