एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅप इमोजीतून छेडछाड, महिला आयोगाकडे तक्रारी
व्हॉट्सअॅप इमोजीच्या माध्यमातून छेडछाड होत असल्याच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या आहेत.
मुंबई : व्हॉटस्अॅप हा बहुतांश स्मार्टफोन यूझर्सच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. कोणी कामासाठी व्हॉट्सअॅप वापरतं, तर कोणी निव्वळ टाईमपास, चॅटिंगसाठी. चॅटिंग करताना इमोजी टाळणं तर अशक्यच. मात्र चॅटिंग हलकंफुलकं करण्यासाठी असलेल्या इमोजीच्या माध्यमातून छेडछाड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
इमोजीच्या माध्यमातून छेडछाड केल्याच्या तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर वापरल्या जाणाऱ्या इमोजीआडून अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
या प्रकाराची उघड तक्रार केली जात नाही. कायद्याच्या कक्षेतही ती येत नाही. मात्र महिला आयोगाकडे अशा अनेक तक्रारी येत असल्याची माहिती आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीही स्थापन केली आहे.
या समितीने केलेल्या शिफारसी राज्य सरकारकडे दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून कायदे अधिक कडक करण्यासंबंधी रुपरेखा आखण्यास मदत होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement