एक्स्प्लोर
विक्रोळीत राहत्याघरी महिलेची गळा दाबून हत्या, पतीवर संशय
पोलिसांनी शव ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविले. शवविच्छेदनच्या प्राथमिक अहवालात या महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई : विक्रोळी पार्कसाईट विभागात एका महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी आजू-बाजूच्या रहिवाशांना शीतल घरात मृत अवस्थेत आढळून आली. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. शीतल सचिन दळवी असे मृत महिलेचे नाव असून ती तीचा पती सचिन दळवी आणि मुलासह विक्रोळी पार्कसाईट येथील राम नगरमध्ये रहात होती. मंगळवारी रात्री शीतल यांचे त्यांचा पतीशी भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन घरातून निघून गेला होता. दुपारी जेव्हा आजू-बाजूच्या रहिवाशांना घरात शीतल या मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या. रहिवाशांनी लगेचच माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविले. शवविच्छेदनच्या प्राथमिक अहवालात या महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. शीतल यांचे पती सचिन या घटनेनंतर फरार आहे. त्यामुळे ही हत्या त्यानेच करुन फरार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















