एक्स्प्लोर
ठाण्यातील उपवन तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या
ठाण्यात राहणाऱ्या 49 वर्षीय भेकानी जलधारी यादव या महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.
ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध उपवन तलावात उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यात राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेचा मृतदेह काल (मंगळवारी) रात्री पोलिसांच्या हाती लागला.
भेकानी जलधारी यादव या महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. ठाणे पश्चिम मधील वागळे इस्टेट परिसरातील रुपदेवी पाडा क्रमांक दोनमध्ये ही महिला राहत होती.
महिलेने आत्महत्या केल्याची माहिती रात्रीच्या सुमारास मिळाल्यानंतर पोलिसांनी तलावात शोध मोहीम हाती घेतली. त्यानंतर काही वेळातच महिलेचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. भेकानी यादवच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement