एक्स्प्लोर

Dahi Handi 2023 : दहीहंडीत जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांचं काय होतं? त्यांची जबाबदारी कोण घेणार? आयोजक की गोविंदा पथक?

Dahi Handi 2023 : दहीहंडीत साहस दाखवताना जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या गोविंदा नामक खेळाडूंचे काय होते, त्यांची जबाबदारी कोण घेणार? आयोजक की गोविंदा पथक?

मुंबई : दहीहंडी (Dahi Handi 2023) उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त तर झाला पण या खेळात साहस दाखवताना जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या गोविंदा (Govinda) नामक खेळाडूंचे काय होते, त्यांची जबाबदारी कोण घेणार? आयोजक की गोविंदा पथक? या प्रश्नांच्या संदर्भात केलेला हा उहापोह.... 

दुसऱ्या थरावरुन खाली पडला अन्

नालासोपाऱ्याचा रहिवासी असलेल्या सूरज कदमने यावेळी त्याच्या तिन्ही भावंडांना वचन दिले होते की, यंदाच्या दहीहंडीतला आपला सहभाग हा शेवटचा असेल. मात्र, त्याच्या नियतीने वेगळीच कलाटणी दिली. ऑफिस बॉय म्हणून काम करणारा हा 25 वर्षीय गोविंदा गुरुवारी नालासोपारा इथे गोविंदाच्या दुसऱ्या थरावरुन खाली पडला अन् त्याला जबर दुखापत झाली. त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने छातीपासून खालचा भाग संवेदनाहीन झाला आहे. तो स्वतःहून काहीच करु शकत नाही. सूरजच्या आई-वडिलांचे कोरोना महामारीत निधन झाले असून त्याला एक लहान भाऊ आणि दोन लहान बहिणी आहेत. ऑफिस बॉयचे काम करुन तो कुटुंबाचे पालन पोषण करतो. सूरज हा घरातील एकमेव कमावता असल्याने त्याच्या आणि इतर भावंडांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सरकारतर्फे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि भाजपातर्फे मदत दिली. आणखी काही लाख त्याला मदत मिळेल अशी आशा आहे. पण हे पैसे किती दिवस पुरणार,  कारण याआधी देखील असे अनेक गोविंदाचे अपघात झाले आहेत जे अजूनही मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे बघत आहेत.

14 वर्षांपासून अंथरुणाला खिळून!

दहीहंडीतील आणखी एक जखमी गोविंदा म्हणजे भिवंडीचा नागेश भोईर. थोडीथोडकी नाही तर गेली 14 वर्षांपासून तो अंथरुणाला खिळलेला आहे आणि याचे कारण काय तर साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झालेला दहीहंडी उत्सव. नागेशच्या या अवस्थेचा त्रास एकट्या त्यालाच होतोय का? तर नाही... त्याच्या घरात देखील सेवानिवृत्त झालेले वडील आहेत, आई आहे, मोठ्या बहिणीला ब्रेन ट्युमर झालाय तर लग्न झालेल्या बहिणी अधूनमधून मदत करत असतात. नागेशच्या उपचाराकरता मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. सुरुवातीच्या काळात मित्रमंडळींनी मदत केली परंतु जसजसा उपचाराचा खर्च वाढला त्यानंतर कोणीही विचारपूस करायला देखील फिरकले नाहीत. 2009 पासून सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र ना सरकार, ना ते आयोजक, ना गोविंदा पथक, कोणीच त्याच्याकडे बघण्यास तयार नाही. 

गोविंदा उत्साहाच्या भरात जातात खरे मात्र एकदा तोल जातो आणि आयुष्यभरासाठी ते दुःखाच्या गर्तेत जाऊन पडतात. मग त्यांची जबाबदारी कोणाची? आयोजकांची की गोविंदा पथकांची की याला परवानगी देणाऱ्या आणि साहसी खेळ घोषित करणाऱ्या सरकारची? हाच प्रश्न आम्ही सर्वात आधी सरकारमधल्या मंत्र्यांना विचारला तर त्यांनी याला धर्माची किनार दिली. 

मंत्री, आयोजक काय म्हणतात?

धार्मिक रीती आहेत, दहीहंडी देशात साजरा होत आहे, एक घटना झाली म्हणून असे होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. दुसरीकडे आयोजक म्हणतात आम्ही सर्व खबरदारी घेतो, सुरक्षितता बाळगतो आणि नियम देखील पाळतो, कोणी जखमी झाले तर मदत देखील करतो. आम्ही सर्व नियम पाळतो, आम्ही सर्वतोपरी मदत करतो, याची जबाबदारी आमचीच, अशी प्रतिक्रिया आयोजक देतात.

मुंबईत यावर्षी एकूण 195 गोविंदा जखमी झाले तर ठाण्यात 20 पेक्षा जास्त गोविंदा जखमी झाले 

त्यापैकी 18 गोविंदा गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, तर इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले

तर 31 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत

ही जखमी गोविंदाची संख्या गेल्यावर्षी पेक्षा तुलनेने नक्कीच कमी आहे, तसेच यावर्षी महाराष्ट्र सरकारने गोविंदांना विमा काढून दिल्याने अनेकांना त्याची मदत देखील झाली, असे दहीहंडी असोसिएशनचे म्हणणे आहे, मात्र तरीही स्पॉट विमा आयोजकांनी काढायला हवा अशीही मागणी ते करतात. 

तात्पुरत्या मदतीऐवजी कायमस्वरुपी मदत सरकार देणार?

सरकार, आयोजक आणि गोविंदा पथक जरी दावा करत असले की ते मदत करतात, पण ती मदत आयुष्यभर थोडीच पुरणार आहे. गेल्यावर्षी एका गोविंदाचा जीव यात गेला, त्याचा जीव कोणी कसा परत आणू शकेल? सूरजसारख्या ज्यांना कायमचे अपंगत्व आले त्यांना कोणी परत चालवू शकेल? त्यामुळे तात्पुरती मदत देण्याऐवजी यासाठी कायमस्वरुपी काही मदत सरकार करु शकेल का हा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमंची अंमलबजावणी आयोजक करतात का? हे देखील पाहणे सरकारचे काम आहे, ते करत नसतील तर कारवाई करणे देखील सरकारचे काम आहे, महत्त्वाचे म्हणजे साहसी खेळ जाहीर करण्याआधी या सर्व गोष्टी करणे गरजचे आहे.

हेही वाचा

Bhiwandi News: भिवंडीतील गोविंदा चौदा वर्षांपासून अंथरुणावरच, सरकारचे मात्र गोविंदाकडे दुर्लक्ष ; मदतीची अपेक्षा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget