Ameet Satam on BMC Mayor: महापौर कोण होणार?; BMC साठी आरक्षण जाहीर होताच अमित साटम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मुंबईचं नेतृत्व...
Ameet Satam on BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे. दरम्यान, मुंबईतील नगरसेवकांच्या संख्याबळानूसार मुंबईचा महापौर महायुतीमधील भाजपचा होण्याची दाट शक्यता आहे.

BMC Mayor Reservation 2026: राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलं. मुंबई आणि पुण्याचं महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी राखीव, तर छत्रपती(BMC Mayor Reservation 2026) संभाजीनगर,नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळाचं महापौरपदही खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर (BMC Mayor Reservation 2026) झालं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे. दरम्यान, मुंबईतील नगरसेवकांच्या संख्याबळानूसार मुंबईचा महापौर महायुतीमधील भाजपचा होण्याची दाट शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप नेते अमित साटम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (BMC Mayor Reservation 2026)
मुंबई शहराला दिशा देण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त नेतृत्व देण्यासाठी सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी मुंबईचं नेतृत्व महिला करणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईची तुंबई होणार नाही, मुंबईत विकास होत असताना आपली मातृशक्ती सज्ज होणार आहे. येणाऱ्या २-३ दिवसांत भाजपच्या गटाची बैठक होईल, शिवसेनेची पण बैठक होईल त्यानंतर सभागृह नेता निवडीची प्रक्रिया होईल, त्याच दिवशी आम्ही नोंदणी करणार आहोत असंही भाजप नेते अमित साटम यांनी म्हटलं आहे, तर महापौरपदी कोण बसणार या प्रश्नावर ते म्हणाले की, सगळे पत्ते आत्ताच उघडले तर उत्कंठा राहणार नाही.(BMC Mayor Reservation 2026)
तर मुंबईच्या महापौर आरक्षण सोडतीबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता, त्याबाबत बोलताना साटम म्हणाले, आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास नाही. नियम प्रक्रिया समजून घेतली नाही. रुल नंबर ३ (१) मध्ये लिहिलंय किमान ३ नगरसेवक एसटीचे असतील तर आरक्षण लागू केलं जाऊ शकतं. मात्र, २ नगरसेवक आहेत, अशात महापौरासाठी एसटीचे आरक्षण लागू होत नाही. गेल्या अनेक निवडणुकीत आरक्षण मिळाले नाही, याआधी मुंबईला एसटीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे ते बाहेर काढण्यात आलं. मुंबईचा नंबर ओबीसी आरक्षणात यायला वेळ आहे, कदाचित पुढच्या वेळी ओबीसी आरक्षण येऊ शकेल असंही साटम म्हणालेत.(BMC Mayor Reservation 2026)
मुंबईकरांनी आपल्याला का कमी केलं याची कारणमीमांसा ठाकरे गटाने करायला पाहिजे. त्यांना नियम माहिती असते तर गोंधळ घातला नसता. अराजकता पसरवण्याशिवाय काहीही ते करु शकत नाही, असा टोलाही त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांना लगावला आहे.
मुंबईसाठी असे होते आतापर्यंतचे महापौर आरक्षण- (BMC Mayor Reservation 2026)
2000 सर्वसाधारण; हरेश्वर पाटील
2002 एससी; महादेव देवळे
2005 सर्वसाधारण; दत्ताजी दळवी
2007 ओबीसी महिला; डॉ. शुभा राऊळ
2009 सर्वसाधारण महिला; श्रद्धा जाधव
2012 सर्वसाधारण; सुनील प्रभू
2014 एससी महिला; स्नेहल आंबेकर
2017 सर्वसाधारण; विश्वनाथ महाडेश्वर
2020 सर्वसाधारण; किशोरी पेडणेकर
2026- सर्वसाधारण
























