एक्स्प्लोर
तक्रारी करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर, निरुपम गटाचा आरोप
काही नेत्यांनी निरुपमांना पदावरुन हटवण्याची मागणी केल्याची माहिती आहे. पण तक्रारी करणारेच भाजपच्या वाटेवर आहेत, असा गंभीर आरोप निरुपम गटाने केला आहे.
मुंबई : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात काँग्रेस नेते पुन्हा एकदा समोर आले आहेत. काही नेत्यांनी निरुपमांना पदावरुन हटवण्याची मागणी केल्याची माहिती आहे. पण तक्रारी करणारेच भाजपच्या वाटेवर आहेत, असा गंभीर आरोप निरुपम गटाने केला आहे.
आमदार असलम शेख, माजी मंत्री सुरेश शेट्टी, जावेद खान, मनपा विरोधी नेते रवी राजा यांच्यासह अनेक नेते आणि काँग्रेसच्या मुंबईतील नगरसेवकांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. तक्रारी करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी माहिती त्यांना दिल्याचं निरुपम गटातील नेत्यांनी सांगितलं.
संजय निरुपम हे असे एकटे नेते आहेत जे काँग्रेसचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरतात, भाजपविरोधी आंदोलने करतात. मुंबईमध्ये काँग्रेसला बळ आणलेलं आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आली.
काँग्रेसचे विद्यमान मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करावं, यासाठी काँग्रेस नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मागणी केली.
संबंधित बातमी :
निरुपमांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी : सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement