पॉक्सो कायद्यात शिक्षेची तरतूद नेमकी काय? खटला पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो? काय सांगतात कायदेतज्ज्ञ अनिकेत निकम
आमच्या लेकी सुरक्षित कशा होणार, सोकावलेल्या सैतानांना कायमची अद्दल कशी आणि कोण घडवणार त्यासाठी हा कायद्याची नेमकी तरतूद काय आहे? कशाप्रकारची शिक्षा देण्यात येते? या संदर्भात कायदेतज्ज्ञ अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर लैंगिक अत्याचारांपासून 18 वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने 2012 मध्ये ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायदा सध्या चर्चेत आहे. बदलापूरच्या घटना ताजी असतानाच अशा अनेक घटना महाराष्ट्र भरातून समोर येताय. पालकांना वेदना होतायत. आमच्या लेकी सुरक्षित कशा होणार, सोकावलेल्या सैतानांना कायमची अद्दल कशी आणि कोण घडवणार त्यासाठी हा कायद्याची नेमकी तरतूद काय आहे? कशाप्रकारची शिक्षा देण्यात येते? या संदर्भात कायदेतज्ज्ञ अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे.
2012 साली केंद्र सरकारनं बालकांविरोधात अत्याचारासाठी कठोर शासन करण्यासाठी कायदा अंमलात आणला होता. कायद्यात तरतुदी अशा आहेत, ज्यात वय वर्ष 18 किंवा त्याहून खाली असावा, सोबतच मुलगा किंवा मुलगींना कायदा समान आहे, यात किमान शिक्षा 10 वर्षांची आहे. बालक जर 16 वर्षाखाली असेल तर किमान शिक्षा 20 वर्षांची आहे, तर सर्वाधिक ही देहदंड आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते अशा तरतुदी आहे. जलदगतीनं खटला चालवावा, पुरावे कसे गोळा करावेत यासंदर्भात देखील नियम सांगितले आहेत. पालकांचा जबाब, त्वरीत न्यायाधीशांसमोर नोंदवून घ्यावा अशा तरतुदी देखील आहेत.