एक्स्प्लोर

Mumbai Local : बुरखा घालून महिलांच्या डब्यात प्रवेश, अनेकींच्या शरीराला स्पर्श केला; संशय येताच चालत्या ट्रेनमधून उडी मारत फिल्मी स्टाईलने पसार

Woman Safety In Mumbai Local Train : बुरखा घातलेल्या व्यक्तीने इतर महिलांच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यावर संशय आल्यानंतर महिलांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. 

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरील एका लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात बुरखा घातलेला एक संशयित व्यक्ती चढल्याने खळबळ उडाली. महिला प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला पकडून चौकशी करण्याचा प्रयत्न केला आणि घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. मात्र घाटकोपर स्थानकाजवळ येताच तो संशयित चालत्या ट्रेनमधून उडी मारून उलट दिशेने जाणाऱ्या कर्जत फास्ट ट्रेनमध्ये चढून फरार झाला. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चालत्या ट्रेनमधून थरारक पळ (Ghatkopar Escape Incident)

मिळालेल्या माहितीनुसार, CSMTकडे जाणारी लोकल ट्रेन घाटकोपर स्थानकात (Ghatkopar Railway Station) पोहोचण्याच्या आधी ही घटना घडली. महिला डब्यात बुरखा परिधान केलेला एक व्यक्ती आल्याचं दिसलं. बुरखा घातलेली व्यक्ती ही डब्यातील इतर महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर काही महिला प्रवाशांना संशय आला. महिलांनी त्याला घेरून प्रश्न विचारायला सुरुवात केली. याच वेळी काही प्रवाशांनी मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग केले.

ट्रेन घाटकोपर स्थानकात शिरण्याच्या आधीच संशयिताने अचानक चालत्या ट्रेनमधून उलट दिशेने उडी घेतली आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या कर्जत जाणाऱ्या फास्ट ट्रेनमध्ये चढून पळ काढला. 

रेल्वेचा संयुक्त तपास सुरू (GRP and RPF Investigation) 

महिला प्रवाशांनी तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर संशयिताचा तपास करण्यात आला, मात्र आरोपीचा कोणताही मागमूस लागला नाही. या प्रकरणी घाटकोपर RPF ने रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कुर्ला GRPचे वरिष्ठ अधिकारी संभाजी यादव यांनी सांगितले की, GRP आणि RPF ची पथके संयुक्तपणे संशयिताचा शोध घेत आहेत. तसेच, मागील महिन्यात अंबिवली रेल्वे स्थानकावर बुरखा घालून आलेल्या एका व्यक्तीने चेन स्नॅचिंग केल्याची घटना समोर आली होती, ज्याची FIR कल्याण GRPमध्ये दाखल आहे. दोन्ही प्रकरणांतील संशयित एकच असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेचा तपास वेगाने सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Bomb Threat Vidhan Bhavan मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Embed widget