एक्स्प्लोर
युतीचा निर्णय लवकर घ्यावा लागेल, अन्यथा निवडणुका होतील : उद्धव ठाकरे
मुंबई : युतीचा निर्णय़ लवकरच घ्यावा लागेल नाही तर निवडणूका होऊन जातील असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. कुठल्याही क्षणी मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मात्र, अद्याप शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दलचा पेच कायम आहे.
युतीबाबत भाजपकडून प्रतिसाद न आल्यानं शिवसेनेनं स्वबळासाठी तयारी सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेनं पडताळणीही सुरु केली आहे. मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंनी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती घेऊन 'एकला चलो'चे संकेत दिले आहेत.
महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेसह इतर ठिकाणीही खुद्द मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही असल्याचं काल भाजपच्या सूत्रांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठकही घेतल्याचं सांगितलं जातं आहे. पण चर्चेचा प्रस्ताव आला नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार की पुन्हा एकदा एकमेकांविरोधात शड्डू ठोकणार हे पाहणं महत्वाचं आहे.
संबंधित बातम्या :
युतीचा पेच कायम, शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु
प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement