एक्स्प्लोर
दोन हजारच्या नोटेची झेरॉक्स काढून बिअर खरेदी, तरुणाला बेड्या
विरार : बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या, मात्र काही जण त्याचे प्रयत्न सोडताना दिसत नाहीत. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटेची कलर झेरॉक्स (फोटोकॉपी) काढून बिअर घेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विरारमधल्या पश्चिममधल्या राज वाईन शॉपमध्ये 26 वर्षीय तुषार कचरु बिअर खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रयत्न त्याने केला. वाईन शॉप मालकांना संशय आल्याने त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नोटेची पडताळणी केली असता, ती खोटी असल्याचं लक्षात आलं. विशेष म्हणजे तरुणाकडून दोन हजारच्या नोटांच्या आणखी सात फोटोकॉपी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करुन बनावट नोटाही जप्त केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement