एक्स्प्लोर
मूल होत नसल्याने डिवचणाऱ्या पत्नीचा काटा काढला, चोरीचा बनाव रचणारा पती अटकेत
विरारमध्ये राहणाऱ्या आरोपी शाम गुप्ताने 50 वर्षीय पत्नीची हत्या केली. त्यानंतर, घरात चोरी झाल्याची तक्रार त्याने पोलिसात दिली.
विरार : मूल होत नसल्याबद्दल सतत कोसणाऱ्या पत्नीचा जीव घेऊन चोरीचं कुभांड रचणाऱ्या पतीचा बनाव उघडकीस आला आहे. विरारमध्ये घडलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिताफीने तिच्या पतीला अटक केली आहे.
विरार पूर्वेकडील कोपरी नाका भागात साहिल नगरमध्ये तीन जुलै रोजी 50 वर्षीय उमाराणी शाम गुप्ता यांची पतीनेच धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर, घरातल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार पतीने विरार पोलिस ठाण्यात दिली.
चोरीच्या उद्देशाने कोणीतरी घरात घुसून आपल्या पत्नीची हत्या केल्याचं सांगत आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना आधीपासूनच पतीवर संशय होता. त्यामुळे पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याच्यावरील संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. अखेर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी कमवलेले सर्व पैसे पत्नीकडे ठेवण्यास देत असे. तसेच पत्नीने कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी पैसे देण्यासही नकार दिला. इतकंच नाही, तर 'तू काही कामाचा नाहीस. तुझ्यापासून मला अपत्यप्राप्तीही होत नाही.' असं टोचून बोलल्याचा राग मनात धरुन पत्नीची हत्या केल्याची कबुली पतीने दिली.
पतीने दगडी वरवंटा आणि लोखंडी फ्लॉवर पॉटने सात वेळा डोक्यावर वार करत, भिंतीवर डोकं आपटून तिची हत्या केली. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement