एक्स्प्लोर

Virar Building Collapse : विरारच्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा दुर्दैवी अंत, बिल्डरला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Virar Building Collapse : विरारच्या इमारत दुर्घटनेत एनडीआरएफच्या पथकाने आत्तापर्यंत 24 जणांना रेस्क्यू केले आहे. तर पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Virar Building Collapse : विरारच्या इमारत दुर्घटनेत एनडीआरएफच्या (NDRF) पथकाने आत्तापर्यंत 24 जणांना रेस्क्यू केले आहे. तर पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नऊ जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला 32 तास उलटले असले असूनही एनडीआरएफच्या पथकाकडून घटनास्थळी शोधमोहीम राबवली जात आहे.  तर वसई विरार महापालिकेने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात (Virar Police Station) अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.  

मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळण्याची (Virar Building Collapse) दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबवले जात आहे. प्रारंभी, जेसीबीसारखी यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला आणि त्यामुळे बचावकार्यास वेग मिळाला.

15 जणांचा मृत्यू, 9 जणांवर उपचार सुरु

घटनेनंतर 32 तासांहून अधिक वेळ उलटून गेला असून, आतापर्यंत 24 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर नऊ जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या बचावकार्य अजूनही सुरू असून, उर्वरित अडकलेल्या नागरिकांना लवकरच बाहेर काढले जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

बिल्डरवर गुन्हा दाखल

तर वसई विरार महापालिकेने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यवसायिकाला विरार पोलिसांनी अटकदेखील केली आहे. या सोबत जागा मालिकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांनी चार  मजली अनाधिकृत इमारत सन 2008 ते 2009 मध्ये बांधली होती. या इमारतीमध्ये 54 फ्लॅट आणि चार गाळे होते. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53 आणि 54 नुसार गुन्हा दाखल केला असून BNS कलम 105 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Virar Building Collapsed: विरारमध्ये वाढदिवसांचं सेलिब्रेशन सुरु असताना बिल्डिंग कोसळली, ढिगाऱ्याखालून चिमुकला देह बाहेर काढला अन्...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं मुंबईत धडकण्याआधी पोलिसांना हमीपत्र; 20 आश्वासने दिली, काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget