एक्स्प्लोर
वायरल चेक : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात डुकराला मानवी बाळ?
सोशल मीडियावरील हा दावा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला आव्हान देणारा आहे. त्यामुळेच याची सत्यता पडताळून पाहण्याचं 'एबीपी माझा'ने ठरवलं
मुंबई : सोशल मीडियावर एका विचित्र प्राण्याचे फोटो सध्या चांगलेच वायरल होत आहेत. या फोटोसोबत डुकाराला चक्क माणसाच्या बाळाप्रमाणेच पिल्लू झालाचा दावा केला जात आहे.
खरं तर मानवाची उत्क्रांती ही माकडापासून झाल्याचं डार्वीनचा सिद्धांत सांगतो. मात्र हे फोटो पाहिल्यावर मनात अनेक प्रश्नही निर्माण होतात. हा फोटो मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला असल्याचंही बोललं जात आहे.
सोशल मीडियावरील हा दावा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला आव्हान देणारा आहे. त्यामुळेच याची सत्यता पडताळून पाहण्याचं 'एबीपी माझा'ने ठरवलं आणि आम्ही थेट पोहचलो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात
दावा क्रमांक 1 - डुकराने दिला मानवी मुलाला जन्म
या दाव्याबद्दल आम्ही पशुवैद्यकीय तज्ज्ञांना विचारलं. तांत्रिकदृष्ट्या कोणतंही डुक्कर मनुष्याच्या मुलाला जन्म देऊ शकत नाही,
असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेश पेठे यांनी सांगितलं. वायरल मेसेज मधला पहिला दावा तर खोटा ठरला.
दावा क्रमांक 2 - हे फोटो मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातले आहेत.
तब्बल 25 हजार 660 एकरावर पसरलेल्या या उद्यानात फोटोत दिसणारी जागा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण फोटोतील ही जागा संपूर्ण उद्यानात कुठेच नाही. यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र विभागाचे अधीक्षक संजय वाघमोडे यांनी शिक्कामोर्तब केलं.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असलेले या फोटोतील दोन्ही दावे 'माझा'च्या पडताळणीत खोटे ठरले आहेत.
डुकरांना मानवी मूल होणार नाहीत हे नक्की असलं, तरी सोशल मीडियावर मानवी पिल्लांकडून सुरु असलेले असे माकडचाळे थांबणं अत्यंत गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement