एक्स्प्लोर
Advertisement
विषारी सापाच्या दंशावर रामबाण इलाज, दाव्यामागील 'वायरल चेक'
विषारी सापाच्या दंशावर 'नाजा 200' हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा 'माझा'च्या वायरल चेकमध्ये खोटा असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर सध्या एक मेसेज चांगलाच वायरल केला जात आहे. तुम्हाला विषारी सापाचा दंश झाला असेल, तरी तुमचा जीव वाचेल, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी 'नाजा 200' हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावाही त्यात करण्यात आला आहे. 'माझा'च्या वायरल चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
जेव्हा आम्ही या औषधाबद्दल गुगल सर्च केलं, तेव्हा या औषधाबद्दल अनेक व्हिडिओ आणि लेख समोर आले. त्यात हे औषध सर्पदंशावर परिणामकारक असल्याचा दावा करण्यात आला. स्वदेशी मंचाचे राजीव दीक्षित यांनीही हे औषध परिणामकारक असल्याचा दावा केला होता.
राजीव दीक्षित यांनी दावा केला असला, तरी त्याला कोणतीही अधिकृत पुष्टी नव्हती. त्यामुळे याच दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहचलो मुंबईतल्या जेजे रुग्णालयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे आणि त्यांच्याकडून या वायरल मेसेजची पडताळणी केली.
या मेसेजमध्ये या औषधाची मात्रा किती असावी, याचाही उल्लेख करण्यात आला आहे. खरं तर डॉक्टरांकडूनच प्रिस्क्रिप्शनवर लिहून घ्यायला हवं, कोणतं औषध तिची मात्रा काय, जेजे रुग्णालयाचे एमडी रेवत कानिंदे यांनी सांगितलं.
अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवला, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, माणसाचा जीव जाऊ शकतो, असंही कानिंदे यांनी सांगितलं. 'माझा'च्या वायरल चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
मित्रांनो, तुमच्या व्हॉट्सॅपवर येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते आणि जेव्हा जीवावर बेतण्याची वेळ आलेली असेल, तेव्हा तर अशा भंपक मेसेजवर विश्वास ठेऊ नका. फुकट जीव गमावून बसाल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement