(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinayak Mete : विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात! त्याआधी सांगितली अपघाताची आपबीती
Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. या अपघातात मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम बचावले आहेत.
Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा बॉडीगार्ड देखील गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याला रसायनी ( रायगड जिल्हा ) पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे.
विनायक मेटेंच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांचा जबाब पोलीस नोंदवणार आहेत. एकनाथ कदम यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहेत. पोलिस चालकाकडून अपघाताचा तपशील पडताळून पाहणार आहेत. आता ड्रायव्हरला रसायनी पोलीस घेवून गेले आहेत. रसायनीमध्ये त्याची मेडिकल करण्यात येणार आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या ठिकाणच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस चेक करणार आहेत. गाडीला अपघात होण्याच्या आधीची वेळ आणि अपघाता नंतरची वेळ तपासली जाणार आहेत. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून गेलेल्या गाड्यांना कोणत्या प्रकारचे अपघाताचे निशान आहेत का? हे सीसीटीव्हीमध्ये तपासणार आहेत.
मेटे यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.
असा झाला अपघात
विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य