मुंबईत वाहन नोंदणीचा वेग 'सुसाट'; वाहनांची संख्या 40 लाखांच्या जवळ, राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात माहिती
मुंबईत 40 लाख वाहने सध्याला आहेत. राज्यातल्या एकूण वाहन नोंदणीपैकी 10.3 टक्के नोंदणी फक्त मुंबई शहरात आहे. दुचाकी वाहनांची संख्याही मागील वर्षी 3 टक्क्यांनी वाढली. ज्यामुळे मुंबईतील दुचाकी वाहनांची संख्या 23.6 लाखांवर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 12.8 लाख हलकी मोटार वाहने आहेत. यातील तब्बल 11 लाख ही खासगी वाहने आहेत.

मुंबई : मुंबईतील लोकसंख्या जशी जशी वाढत आहे. त्याचसोबत मुंबईतील वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहन नोंदणीचा वेग इतका सुसाट झाला आहे की, शहरामध्ये सर्वाधिक वाहन नोंदणी झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबईत इतर राज्याच्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाहनांची नोंदणी होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईत भेडसावणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही समस्या यातून निर्माण झाली आहे.
धोक्याची घंटा
मुंबईतील वेगाने वाढणारा वाहतूक नोंदणीचा दर ही भविष्यातील धोक्याची घंटा असून यामुळे शहरातील समस्येमध्ये भर पडणार आहे. मुंबईतील वाहनांची संख्या 40 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये राज्यातल्या एकूण वाहन संख्येपैकी 10 टक्क्यांहून अधिक वाहनांची नोंदणी मुंबईत होत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत वाहनांची गर्दी!
मुंबईत 40 लाख वाहने सध्याला आहेत. राज्यातल्या एकूण वाहन नोंदणीपैकी 10.3 टक्के नोंदणी फक्त मुंबई शहरात आहे. दुचाकी वाहनांची संख्याही मागील वर्षी 3 टक्क्यांनी वाढली. ज्यामुळे मुंबईतील दुचाकी वाहनांची संख्या 23.6 लाखांवर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 12.8 लाख हलकी मोटार वाहने आहेत. यातील तब्बल 11 लाख ही खासगी वाहने आहेत.
मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोनच पर्याय असू शकतात. ज्यामध्ये मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवावी लागेल आणि दुसरी म्हणजे मुंबईतील सार्वजनिक बस वाहतुकीसाठी एक लेन राखीव ठेवावी. त्याचसोबत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांवरील बसेसची वारंवारता वाढवावी, असं वाहतूक आणि परिवहन तज्ज्ञ अशोक दातार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं
मुंबईत वाहनांची घनता प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यात वाहनांची संख्या वाढल्याने याचा परिणाम रस्त्यांवर येत्या काळात दिसण्याची शक्यता आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था आणि मोठ्या प्रमाणात निर्माणाधिन असलेल्या कामांमुळे मुंबईकर तसाच त्रस्त आहे. त्यात सार्वजनिक वाहतुकीचीही वानवा आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात मुंबईतील रस्त्यांवर रहदारी वाढेल आणि त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही दिसेल यात शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























