WB Election 2021 | निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांना दुखापत, पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली असतानाच आता एका महत्त्वाच्या घटनेनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली असतानाच आता एका महत्त्वाच्या घटनेनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुक प्रचारादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला आहे. नंदीग्राममध्ये त्यांच्या पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब समोर येत असून, त्यांना कोलकात्याला हलवण्यात आलं आहे.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2021 | बुधवार
आपल्यासोबत झालेली ही दुर्घटना राजकीय द्वेषापोटी झाली असून, यामागे सुडाची भावना असल्याची बाब त्यांनी प्रकाशात आणली. शिवाय सदर घटनेबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बॅनर्जी यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार समोर आली असून, त्यांच्यासोबत ही घटना घडली त्यावेळी स्थानिक पोलीस त्यांच्यासोबत नव्हते.
दरम्यान, यंदाच्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी त्यांची अनेक वर्षांपासून चालत आलेली भवानीपूर येथील उमेदवारीची जागा सोडत नंदीग्राम येथून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय जनता पक्षाकडून इथं शुभेंदू अधिकारी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. शुभेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. पण, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते थेट बॅनर्जी यांच्याविरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Nandigram: West Bengal CM Mamata Banerjee says she has suffered an injury in her leg after few people pushed her as when she was near her car pic.twitter.com/wx69lVdsbB
— ANI (@ANI) March 10, 2021
पश्चिम बंगालमध्ये आठ सत्रांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. 27 मार्चपासून राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे, तर नंदीग्राममध्ये 1 एप्रिलला मतदान होणार आहे. ममता बॅनर्जी या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्यामुळं या भागानं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे.