एक्स्प्लोर
पहिल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी वसईत निष्पापाची हत्या
दारुच्या पार्टीद्वारे मैत्री करुन, या इसमाने एका अज्ञाताची हत्या केली. या हत्येत पत्नीच्या पतीला फसवण्याचा कट रचला. मात्र, पोलिसांनी खऱ्या आरोपीला गजाआड केलं.

वसई : पहिल्या पत्नीला आणि तिच्या नव्या पतीला धडा शिकवण्यासाठी वसईत एका इसमाने निष्पापाचा बळी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या चार दिवसात, दारुच्या पार्टीद्वारे मैत्री करुन, या इसमाने एका अज्ञाताची हत्या केली. या हत्येत पत्नीच्या नव्या पतीला फसवण्याचा कट रचला. मात्र, पोलिसांनी खऱ्या आरोपीला गजाआड केलं. रिंकू उर्फ अश्विनीकुमार श्रीवास्तव, याने आपल्या पहिल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी आणि आपल्या कडे परत येण्यासाठी तिच्या नव्या पतीला खोटया गुन्हयात अडकवण्याचा कट रचला होता. नायगांव पूर्व रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर म्हात्रे यांच्या बंगल्यासमोर 11 फेब्रुवारी रोजी एक अज्ञात मृतदेह आढळला. यावेळी मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. मात्र, त्याच्या खिशात विनयकुमार यादव नावाचं विझिटिंग कार्ड, मोबाईल नंबर मिळाला. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरु केला. पण तपासात वेगळीच माहिती समोर आली. हत्येच्या घटनेपूर्वी आरोपीने पहिल्या पत्नीचा नवा पती विनयकुमारला धमकी दिली होती. त्यानुसार, आरोपीने विनयकुमार यादवला अडकवण्यासाठी एका अनोळखी इसमाशी दारू पार्टीद्वारे मैत्री केली. ही मैत्री अगदी गाढ झाली. त्या रात्री दारु पिण्यासाठी बसल्यानंतर आरोपीने मित्राच्या अंगावर 17 गंभीर वार करून, त्याची हत्या केली. यानंतर त्याच्या खिशात विनयकुमारचं विझिटिंग कार्ड आणि मोबाईल नंबर ठेवून फरार झाला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी रिंकू ऊर्फ अश्विनीकुमार श्रीवास्तवला गुजरातमधून अटक केली. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या पहिल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















