एक्स्प्लोर

Varsha Bungalow : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'वर्षा' बंगल्यावर वास्तव्यास जाणार नाहीत!

Varsha Bungalow : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणून 'वर्षा' बंगल्याची ओळख आहे. परंतु एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास जाणार नाहीत.

Varsha Bungalow : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) वास्तव्यासाठी जाणार नाहीत. एकनाथ शिंदे 'वर्षा'मधील मुख्यमंत्री कार्यालयाचा वापर बैठकांसाठी करणार आहे. त्यामुळे नंदनवन (Nandanvan) हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार इथल्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज (9 ऑगस्ट) वर्षा बंगल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी कार्यलयाची पाहणी केली. त्यानंतर छोटेखानी पूजाही पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्य न करण्याचा निर्णय घेतला. ते सध्या वास्तव्य करत असलेल्या 'नंदनवन' इथेच त्यांचा मुक्काम असेल. तर मुख्यमंत्री वर्षा, मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहावर  रोजच्या बैठका घेणार आहेत. 

सहा दिवसांपूर्वी 'वर्षा' बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी 'वर्षा' निवासस्थान सोडलं होतं. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. अखेर सहा दिवसांपूर्वी  वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावण्यात आली. तसंच 'वर्षा' बंगल्याची रंगरंगोटी देखील पूर्ण झाली. राज्यात सत्तांतर होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शपथ घेतली. प्रथा आणि नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर असतं. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर महिना उलटला तरी एकनाथ शिंदे 'नंदनवन' बंगल्यावर वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'वर्षा' बंगल्यावर राहायला जाणार का? असा प्रश्न विचारला जात होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला.

'वर्षा' बंगल्याचा रंजक इतिहास
'वर्षा' बंगल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. 'वर्षा' या बंगल्याचे मूळ नाव 'डग बीगन' होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्री' बंगला हे आपले अधिकृत निवासस्थान केले होते. चव्हाण यांच्यानंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी ही परंपरा कायम ठेवली. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या कृषीमंत्री वसंतराव नाईक यांच्या वाट्याला 'डग बीगन' हा बंगला आला. कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्याच बंगल्यात राहायचा निर्णय घेतला आणि त्याचं नाव 'वर्षा' असं ठेवलं. तेव्हापासून वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री असं नातं तयार झालं जे आजतागायत कायम आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घटनांचा, घडामोडींचा साक्षीदार 'वर्षा' बंगला
अनेक मोठ्या राजकीय घडामोडी आणि त्यामधील विविध रहिवाशांमुळे 'वर्षा' बंगला कायम चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे, आजवर फक्त दोन मुख्यमंत्रीच (वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस) पूर्ण पाच वर्षे या बंगल्यात राहू शकले आहेत. त्याचप्रमाणे कोणतंही निर्वाचित पद कधीच न भूषवलेले उद्धव ठाकरे 'वर्षा'मध्ये प्रवेश करणारे अपवादात्मक मुख्यमंत्री ठरले. 'वर्षा' बंगल्याला महिला मुख्यमंत्री मात्र आजवर लाभलेली नाही. अशा 'वर्षा'चा इतिहास एकप्रकारे महाराष्ट्राची राजकीय कुंडलीच म्हणता येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Embed widget