एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, उर्मिला मातोंडकरने मिलिंद देवरांना लिहिलेलं जुनं पत्र समोर
काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु असून, मिलिंद देवरा यांनीही मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुंबई काँग्रेसचं कामकाज चालवण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करावी असं त्यांनी सूचवलं होतं.
मुंबई : मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील वाद धुमसत असतानाच, काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं एक जुनं पत्र समोर आलं आहे. उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात पत्र लिहिलं होतं.
लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी म्हणजेच 16 मे 2019 रोजी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक नीट हाताळली नाही. शिवाय चुकीची रणनीती चुकीची आखल्याचंही उर्मिला मातोंडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, जाणीवपूर्वक जुनं पत्र प्रसारमाध्यमांना देऊन उर्मिला मातोंडकर राजकारण करत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु असून, मिलिंद देवरा यांनीही मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुंबई काँग्रेसचं कामकाज चालवण्यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करावी असं त्यांनी सूचवलं होतं. त्यानंतर संजय निरुपम यांनी मिलिंद देवरांवर ट्विटद्वारे निशाणा साधला. निरुपम यांनी देवरांच्या सूचनेला विरोध केला. एका प्रदेशाध्यक्षाऐवजी तीन सदस्यांची नियुक्ती करणं योग्य नसल्याचं निरुपम यांनी म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement