एक्स्प्लोर
मलनिस्सारण केंद्रात विषारी गॅसमुळे तीन मजुरांचा मृत्यू
विषारी गॅसमुळे चार मजूर बाधित झाले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाला मीरा रोडच्या भक्तीवेदांत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांचा सुद्धा विषारी वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाला. मृत कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.
मीरा रोड : मीरा रोडच्या शांती गार्डन जवळील मलनिस्सारण केंद्रात तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास पाच मजूर मलनिस्सारण केंद्राच्या टाकीत वॉल खोलण्यासाठी उतरले होते. मुझफ्फर मोहलिक (वय 24), रफिक मंडळ (वय 50), मफिजूल (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. तर आफतार मुल्ला (वय 40) हा जखमी आहे.
ही टाकी कित्येक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गॅस जमा झाला होता. दुपारी दोनच्या सुमारास टँकमध्ये उतरलेले कामगार बाहेर पडले व दुपारच्या जेवणासाठी गेले. त्यावेळी एक कामगार टँकमध्ये सफाईचे काम करत होता. त्या कामगाराला अचानक अस्वस्थ वाटू लागले व तो तिथेच कोसळला. त्याच्या मदतीसाठी म्हणून बाहेर आलेले अन्य दोन कामगार पुन्हा आत उतरले.
विषारी गॅसमुळे चार मजूर बाधित झाले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाला मीरा रोडच्या भक्तीवेदांत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांचा सुद्धा विषारी वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाला. मृत कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement