एक्स्प्लोर
माझा इफेक्ट : उल्हासनगरमधील डान्सबारवर महापालिकेचा हातोडा

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्सबारचा एबीपी माझाने पर्दाफाश केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना घेऊन या बारवर धाड टाकली. मात्र, धाड कमी अन् पाहणी दौराच जास्त वाटत असलेल्या या कारवाईत बेवॉच आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ बारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आढळली. याबाबत 'एबीपी माझा'नं बातमी प्रसारित केल्यानंतर काही तासांतच उल्हासनगर महापालिकेनं या बारवर कारवाई केली.
बारचा दुसरा मजला पूर्णपणे अनधिकृत असल्याचं खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्याच तोंडून उघड झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. त्यामुळे बुधवारी सायंकाळी स्वतः पालिका आयुक्त सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी पथकासह बेवॉच बार गाठत कारवाई केली आणि बारच्या दुसऱ्या मजल्यावरचं संपूर्ण बांधकाम तोडलं.
यावेळी हा बारच अनधिकृत असल्याची शक्यताही व्यक्त झाली असून तसं असेल, तर संपूर्ण बार तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
बेवॉच बारप्रमाणेच उल्हासनगरातील अनेक बारमध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं करण्यात आल्याचं बोललं जातं. त्यामुळे केवळ दिखाऊपणापर्यंत ही कारवाई सिमित राहते? की इतर बारवरही हातोडे पडतात? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
