एक्स्प्लोर

तुमचा आणि आझादीच्या लढ्याचा संबंध काय? तुमची जिंकायची औकात नाही म्हणून ED, CBI घुसवताय; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Uddhav Thackeray : अनेक राज्यांनी कुटुंब नियोजन केलं, लोकसंख्या नियंत्रित केली. पण महिला आरक्षणाच्या आडून भाजपवाले देशाची वाट लावणारे विधेयक आणण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मुंबई : ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढत आहेत, पण भाजपवाल्यांची लढण्याची औकात नाही, म्हणून सगळीकडे ईडी आणि सीबीआय घुसवतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. योगी आदित्यनाथ बंगालमध्ये जाऊन आझादीची भाषा करतात, पण त्यांच्या पक्षाचा आणि आझादीचा काय संबंध? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे हे भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "योगी आदित्यनाथ म्हणतात की विवेकानंद हे बंगालचे सुपुत्र होते. ते म्हणाले, तुम मुझे खून दो, में तुम्हे आझादी दूंगा. पण तुमच्या पक्षाचा आणि आझादीचा काय संबध? तुमचा पक्ष जिंकण्यासाठी फौजा घुसवतोय. तुमची औकात नाही जिंकायची म्हणून तुम्ही इडी, CBI घुसवताय. ईडी, CBI बाजूला ठेवा आणि मग शिवसेनेसोबत सामना करा."

उद्धव ठाकरे म्हणाले की, "ममता बॅनर्जी वाघिणीसारखी लढत आहेत, त्यामुळे त्या जिंकल्याच पाहिजेत. बंगालमध्ये 2 लाख CRPF चे जवान उतरवले आहेत. तिकडे मणिपूरला 20 हजार जवान उतरवले होते. योगी आदित्यनाथ आणि आपले मुख्यमंत्री बंगालमध्ये गेले आहेत. इकडे आपल्या राज्यात महिलांचा विनयभंग होतोय, ड्रग्स प्रकरण बाहेर येताहेत, पण यांना बंगाल जिंकायचा आहे."

कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे का? 

महिला आरक्षणाबद्दल भाजपला एवढा कळवळा असेल तर मग संसदेच्या उद्घाटनावेळी आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी महिला राष्ट्रपतींना का बोलवलं नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून त्यांना बोलावलं नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "हे आमचे मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार? महिला बिलाच्या आडून हे देशाची वाट लावणार होते. 2026 पर्यंत आपण लोकसंख्या कमी करण्यासाठी काही बिल आणलं आहे का? कित्येक अशी राज्यं आहेत जे परिवार नियोजन करत आहेत. कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे का? मोहन भागवत म्हणतात दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म द्या, पण त्यांना नोकऱ्या कोण देणार?"

आमचा संबंध त्या भगव्याशी

उद्धव ठाकरे म्हणाले, "भारतीय कामगार सेनेची 58 वर्षे झाले, आपण कधीच कामगारांचा घात केला नाही. आता नवीन दुकानं उघडली जात आहेत, लोकांना  खरेदी केलं जात आहे. युनियन म्हणजे दुकानदारी झाली, चांगली चाललेली युनियन फोडायची, तोडायची आणि नंतर बोंब मारयची. 500 रुपयांसाठी आयुष्याची वाट लावून घ्यायची. सगळींकडे आपल्या युनियन्स आहेत, सगळ्या मालकांशी माझ्या ओळखी आहेत. पण माझा संबंध त्या युनियनच्या भगव्यासोबत आहे, मी एवढं परखड वागत असलो तर तुम्ही सुद्धा वागलं पाहिजे."

कामगार म्हणजे देशाचा भाग्यविधाता नाही का? आजपर्यंत जे जे लढे झाले त्या लढ्यात कामगार उतरला नसता तर आपलं स्वातंत्र दूर गेलं असतं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर यशस्वी झालाच नसता. पाहिजे तेव्हा कामगारांच्या बाजूने बोलायचं आणि प्रत्यक्षात वाटोळ करायचं, असं भापजकडून सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget