एक्स्प्लोर

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

Election Commission : भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईमतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी  पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची  निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.  भाजप नेते आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.

 भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती.   त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर  केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश  दिले आहेत.  

उद्धव ठाकरेंविरोधात खटला दाखल होण्याची शक्यता 

 आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याविरोधात खटला देखील  दाखल होण्याची शक्यता आहे.  

काय सांगतो नियम? 

शेवटच्या 48 तासात ज्यावेळी कोड ऑफ कंडक्ट लागतो म्हणजे ज्या वेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर एक तासाचा जो काळ असतो त्या काळात कोणीही प्रचार करायचा नसतो. प्रतिक्रिया जरी दिली तरी त्यामध्ये मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. मात्र थेट  कोणत्या पक्षावर, व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबईचे मतदान गाजले ते त्याच्या भोंगळ कारभारामुळे...  सामान्य जनता, विरोधी पक्ष, कलाकार सगळ्यांनीच टीका केला होती. मुंबईतील मतदारसंघातून संथ गतीने मतदान झाल्याच्या तसेच रांगेत अनेक तास ताटकळत अभे राहूनही अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव  ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर  केले.  निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.

आशिष शेलारांनी  काय तक्रार केली?

उद्धव ठाकरेंनी  भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी  पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहे.   

हे ही वाचा :

मनोज जरांगे पाटील यांचा निवडणुकीवर परिणाम झाला किंवा नाही हे उद्या सांगेन : पंकजा मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget